Bhooth Bangla BO Collection pudhari photo
मनोरंजन

Bhooth Bangla BO Collection |अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीचा मोठा धमाका; 'भूतबंगला'ची पहिल्याच दिवशी 'भूलभुलैया २'ला धोबीपछाड?

भूतबंगला बॉक्स ऑफिस: अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीचा मोठा धमाका; पहिल्याच दिवशी 'भूलभुलैया २'ला धोबीपछाड?

स्वालिया न. शिकलगार

अक्षय कुमारचा 'भूतबंगला' चित्रपट आज १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमध्येच ₹३.५० कोटींची कमाई केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा एकूण गल्ला ₹१५ कोटींहून अधिक जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या कमाईने अक्षय कुमारच्या मागील अनेक चित्रपटांना आणि 'भूलभुलैया २' च्या ओपनिंगला (₹१४.११ कोटी) मागे टाकले आहे.

Bhooth Bangla BO Collection

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार हे १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची दमदार सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ट्रेड अॅनॅलिस्टच्या प्राथमिक अंदाजानुसार, 'भूतबंगला' चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) भारतात १५ कोटी ते १८ कोटी दरम्यान कमाई केली आहे. या चित्रपटाने गुरुवारी रात्री झालेल्या पेड प्रिव्ह्यूमधूनच ३.५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. अक्षय कुमारसाठी हा चित्रपट त्याच्या करिअरमधील एक मोठा 'टर्निंग पॉईंट' मानला जात आहे, कारण मागील काही वर्षांत त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकलेले नाहीत.

'भूलभुलैया २' चा विक्रम मोडला

कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलैया २' ने पहिल्या दिवशी १४.११ कोटींची कमाई केली होती. मात्र, अक्षय कुमारच्या 'भूतबंगला'ने पहिल्याच दिवशी १५ कोटींचा टप्पा पार करून या रेकॉर्डला मागे टाकले आहे. प्रियदर्शन यांच्या सिग्नेचर स्टाईलमधील कॉमेडी आणि हॉररचा तडका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे चित्र आहे.

'भूत बंगला'चे ॲडव्हान्स बुकिंग

'भूत बंगला'साठीचे ॲडव्हान्स बुकिंग या आठवड्याच्या सुरुवातीलाच सुरू झाले आणि 'प्री-सेल्स'च्या माध्यमातून या तिकिट विक्री झाली. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसासाठी १.३ लाख तिकिटांची विक्री केली. मीडिया रिपोर्टनुसार, 'भूत बंगला'ने पहिल्या दिवसाच्या भारतात ३.३२ कोटींची कमाई केली आहे.

पेड प्रिव्ह्यूचा अधिक फायदा

या चित्रपटाला 'पेड प्रिव्ह्यूज'चा अधिक फायदा मिळाला. या चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यूज' गुरुवार, १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सुरू झाले. मोजेकच शोज उपलब्ध असूनही, 'भूत बंगला'ला 'पेड प्रिव्ह्यूज'मधून ३.५० कोटींची 'नेट' कमाई केलीय.

चित्रपटगृहांमध्ये अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव या त्रिकुटाची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. 'हेरा फेरी' आणि 'भूलभुलैया' (२००७) ची आठवण करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यात यशस्वी ठरला आहे. शनिवार आणि रविवारच्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता, हा चित्रपट पहिल्या वीकेंडला ₹५० कोटींचा टप्पा सहज पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रणबीर सिंगचा 'धुरंधर २' सध्या थिएटरमध्ये असला तरी, फॅमिली ऑडिअन्सने 'भूतबंगला'ला अधिक पसंती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT