भारती सिंहने तिच्या लहान मुलगा ‘काजू’चा पहिला चेहरा सोशल मीडियावर शेअर करताच तो क्षणात व्हायरल झाला. ‘गोले’च्या छोट्या भावाचा निरागस आणि गोंडस लूक पाहून चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. भारती आणि हर्षच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Bharti Singh Reveal Son Kaaju Face quteness overloaded
लोकप्रिय कॉमेडियन Bharti Singh ही नेहमीच तिच्या विनोदी शैलीमुळे आणि खास व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भारतीने नुकताच तिच्या लहान मुलगा ‘काजू’चा पहिला चेहरा चाहत्यांसमोर आणला असून, सोशल मीडियावर त्याचा क्यूटनेस अक्षरशः व्हायरल झाला आहे.
भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा मोठा मुलगा ‘गोला’ आधीपासूनच चाहत्यांचा लाडका आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. आता ‘गोले’ला छोटा भाऊ मिळाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती की, ‘काजू’ कसा दिसतो? अखेर भारतीने ही उत्सुकता संपवली आहे.
कॉमेडियन भारती सिंह-पती हर्ष लिम्बाचियाने दुसरा मुलगा यशवीर (काजू)चा पहिला फोटो दाखवला आहे. भारतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅमिली फोटोशूट शेअर केले आहे. भारतीने १९ डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या मुलाला जन्म दिला होता. तिने आपल्या एका नव्या व्लॉगमध्ये हे खास मोमेंट कॅप्चर केलं आणि फॅन्ससोबत शेअर देखील केलं.
या आधी भारती सिंह आपल्या छोट्या काजूचे केवळ छोटे-छोटे झलक दाखवत होती. तिने बाळाचा चेहरा कधीच दाखवला नव्हता. पण आता भारतीने आपल्या या क्यूट मुलाचा चेहरा आपल्या फॅन्स समोर आणला आहे. या औचित्याने भारती-हर्षने एक थीम पार्टी देखील आयोजित केली होती, ज्यामध्ये काही पाहुणे मंडळी सहबागी झाली होती.
ही पार्टी ला मोठा मुलगा गोलेच्या आवडत्या गोगलगाय (स्नेल्स) च्या थीमवर आधारित होती. त्यावेळी भारतीने पिवळ्या रंगाचा सूट घातला होता आणि मुलाचा चेहरा गुलाबाने झाकला होता. कॅमेरा काजूच्या जवळ जाताच गुलाब हटवून चेहरा दाखवण्यात आला.