Bharat Bhhagya Viddhaata Box Office Collection Day 3 Pudhari
मनोरंजन

Bharat Bhhagya Viddhaata BO: ‘भारत भाग्य विधाता’ची बॉक्स ऑफिसवर घसरगुंडी; 3 दिवसांत किती कोटी कमावले?

Bharat Bhhagya Viddhaata Box Office Collection Day 3: कंगना राणावतच्या ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bharat Bhhagya Viddhaata Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’ सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. समीक्षकांकडून चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी कमाईच्या बाबतीत मात्र हा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही.

12 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत देशभरात केवळ 4.25 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत 24 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि एका दिवसात 1.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, ही कमाई कंगनाच्या मागील ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी असल्याचे दिसून येते.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘भारत भाग्य विधाता’ने पहिल्या विकेंडमध्ये 4.25 कोटी रुपयांची नेट कमाई तर 5.09 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. दुसरीकडे, याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाने तीन दिवसांत 5.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर मनोज बाजपेयी यांच्या ‘गव्हर्नर’ चित्रपटाने 3.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कंगनाचा हा चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या मागे असला, तरी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजस’पेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. ‘तेजस’ने तिसऱ्या दिवसापर्यंत 3.75 कोटी रुपये कमावले होते, तर ‘भारत भाग्य विधाता’ने 4.25 कोटींचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान, हरियाणा सरकारने या चित्रपटाला करमुक्त (Tax Free) दर्जा दिल्याने निर्मात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी या चित्रपटाचे कौतुक करत, प्रेरणादायी चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. कंगना राणावतनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दिग्दर्शक मनोज तापाडिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान परिचारिकांनी दाखवलेल्या धैर्य आणि मानवतेची कहाणी मांडतो. कंगना राणावतसोबत गिरीजा ओक, स्मिता तांबे, आशा शेलार आणि प्रिया अरुण बेर्डे यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT