मनोरंजन

भाग्य दिले तू मला : राज कावेरीच्या प्रेमासाठी देणार सत्वपरीक्षा !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना तसेच शेतकाम,टेम्पो ड्रायव्हरचे काम करताना दिसणार आहे. अखेर प्रेक्षक जे क्षण बघायला आतुर होते ते मालिकेत बघायला मिळणार आहे. राज कावेरीमध्ये आता प्रेम बहरू लागले आहे. त्यांच्यातील काही रोमँटिक क्षण मालिकेत बघायला मिळणार आहे. तसेच एक सरप्राईज देखील आहे जे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.

कावेरीसमोर वैदेहीचा खरा चेहरा आला आणि तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. कावेरीचे राजवर प्रेम आहे, हे वैदेहीला पहिल्यापासून माहिती असून ती अनभिज्ञ आहे असे दाखविले. यामुळे कावेरी दुखावली गेली. तिने सगळ्यांसमोर वैदेहीचा पर्दाफाश केला आणि राजवर तिचे अपर प्रेम आहे अशी कबुली दिली. तात्यांनी मात्र याला नकार दिला आणि कावेरीला तिथून घेऊन गुहागरला निघून गेले. आता तात्यांनी राजला चॅलेंज दिले आहे की, या गावात राहून दाखव कमवून दाखव. ते राजने स्वीकारलेदेखील आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या चॅलेंजमध्ये राज स्वतःला कसं सिद्ध करेल? कसं हे आव्हानं पूर्ण करेल? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT