Elvish Yadav upcoming campus drama Aukaat Ke Bahar trailer out now  
मनोरंजन

Aukaat Ke Bahar | आग ही आग! एल्विश यादव देणार सडेतोड उत्तर, ‘औकात के बाहर’चा ट्रेलर पाहिला का?

upcoming campus drama Aukaat Ke Bahar Elvish Yadav - आग ही आग! एल्विश यादव-मल्हार राठोड देणार सडेतोड उत्तर, ‘औकात के बाहर’चा ट्रेलर पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

‘औकात के बाहर’ या एल्विश यादवच्या नव्या अॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यातील त्याचा आक्रमक अंदाज, दमदार डायलॉग्स आणि सडेतोड उत्तरांमुळे फॅन्समध्ये उत्साहाची लाट आहे.

Elvish Yadav upcoming campus drama Aukaat Ke Bahar trailer released

मुंबई - एल्विश यादवचा आगामी कँपस ड्रामा' औकात के बाहर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. एक हृदयस्पर्शी स्टोरी ज्यामध्ये एल्विश यादव आणि मल्हार राठोड मुख्य भूमिकेत आहेत. कँपस जीवन, दिल्लीत शूट केलेले चित्रण, प्रेमभंग, शत्रुत्व आणि मॉर्डन रोमान्सचा मिलाफ असलेली कथा 'औकात के बाहर'मधून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला आहे. एल्विशचा हा सर्वात आक्रमक आणि अॅक्शनने भरलेला अंदाज पाहायला मिळत आहे. कॉलेज जीवनातील किस्से एल्विश यादवच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहेत.

हे असतील महत्त्वाचे कलाकार

औकात के बाहरमध्ये मल्हार राठोड, केशव साधना, हेतल गाडा, निखिल विजय हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत.

एल्विशचा प्रभावी अभिनय

अनेकांनी एल्विशचा हा आतापर्यंतचा सर्वात प्रगल्भ आणि प्रभावी अभिनय असल्याचे म्हटले आहे. एल्विशनेही ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी भाई आग लगा दी, हीच आहे रियल औकात अशा कॉमेंट्स केल्या आहेत.

औकात के बाहरच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय?

एल्विश यादव राजवीर अहलावत ही भूमिका साकारत आहे. सोबत ट्रेलरची सुरुवात होते. राजवीर हा सफीदों, हरियाणाचा नम्र तरीही प्रखर व्यक्तीमत्वाचा तरूण आपल्या अवाक्यापलिकडली स्वप्न पाहतो. दिल्लीच्या मोठ्या कॉलेजमध्ये जातो. फ्रेशर पार्टीमध्ये त्याची थट्टा केली जाते. तो त्याची सिनियर अंतरा शुक्ला (मल्हार राठोड) हिला इंप्रेस करण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पैज लावतो. अंतरा शुक्ला एक विश्वासू विद्यार्थिनी आहे. कॉलेजमधील राजकारण आणि भावनांचा कल्लोळ...प्रेमळ, मिश्किल कथा पाहायला तयार राहा!

काय म्हणाला एल्विश?

सीरीजमधले राजवीर हे पात्र साकारण्याबद्दल एल्विश यादव म्हणाला, औकात के बाहर मला अतिशय आवडला. कारण हे प्रेमकथेहून जास्त आहे. आत्मसन्मान आहे..प्रामाणिकपणा आणि तुमच्याबद्दल लगेच मत बनवणाऱ्या जगात स्वत:ची जागा बनवण्याच्या राजवीरच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. औकात के बाहर एमएक्स प्लेयरवर ३ डिसेंबरला पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT