remove ban on The Bengal Files in west Bengal demanded producers  Instagram
मनोरंजन

'प. बंगालमध्ये 'The Bengal Files' वरील बंदी हटवावी', पंतप्रधान मोंदीना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

'द बंगाल फाईल्स'च्या समर्थनार्थ उतरले प्रोड्युसर्स असोसिएशन : पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

स्वालिया न. शिकलगार

मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांच्या चर्चेत असलेला ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट आता एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समाजातील काही गटांकडून चित्रपटावर विरोध सुरू असताना विशेषत: पश्चिम बंगलामध्ये. आता IMPPA (इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशन) खुल्या पद्धतीने या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरली आहे. या संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

५ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला विवेक रंजन अग्निहोत्री यांचा चित्रपट द बंगाल फाईल्सला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतरदेकील पश्चिम बंगालमध्ये रिलीज होऊ दिलं नाही. यावर आता IMPPA (इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन) चे अध्यक्ष अभय सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं आहे, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMMPA) ने पश्चिम बंगाल सरकार (ममता बनर्जी) द्वारा चित्रपटावर लावण्यात आलेली बेकादेशीर आणि असंवैधानिक बंदी विरोधात हस्तक्षेप करावा, यासाठी 'द बंगाल फाईल्स'चे जोरदार समर्थन करत पीएमओ आणि नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

आमचे सदस्य IAMBUDDHA एंटरटेनमेंट अँड मीडिया लिमिटेड निर्मित "द बंगाल फाईल्स" या चित्रपटाच्या प्रदर्शनात येणाऱ्या अडचणींबाबत आम्ही तुम्हाला त्वत्का‍ हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून सार्वजनिक प्रदर्शनासाठी योग्यरित्या प्रमाणित करण्यात आले आहे आणि म्हणूनच देशभरात प्रदर्शित होण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. तरीही, हा चित्रपट पश्चिम बंगाल राज्यात प्रदर्शित होत नाही. अधिकृतपणे बंदी नसतानाही, चित्रपटावर अप्रत्यक्ष निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे लोकांना तो पाहण्याची योग्य संधी मिळत नाही.

चित्रपटावरील वाद काय?

द बंगाल फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर काही राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी याला विरोध दर्शवला. त्यांच्या मते, चित्रपट एकतर्फी विचार मांडतो आणि काही विशिष्ट समुदायाविरुद्ध द्वेष पसरवतो. या विरोधामुळे काही ठिकाणी चित्रपटगृहे दबावाखाली आली आणि शो रद्द करण्यात आले. यामुळे चित्रपटाशी संबंधित निर्माते आणि वितरक अडचणीत आले. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींचे म्हणणे आहे की, यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

पंतप्रधानांकडे मागणी

पत्राद्वारे संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, सरकारने अशा प्रकारच्या धमक्या व विरोधाविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी आणि चित्रपटांचे निर्बंध हटवून प्रदर्शन सुनिश्चित करावे.

फिल्म फेडरेशनने देखील बंदीवर दर्शवली नाराजी

IMPPA च्या आधी FWICE (फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एंप्लॉयज) ने देखील द बंगाल फाईल्स चित्रपट पश्चिम बंगाल मध्ये रिलीज न झाल्याने नाराजी वर्तवली होती. त्यांचे म्हणणं होतं की, चित्रपटावर अनौपचारिकपणे बंदी घालणे चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT