पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसमध्ये वर्षा उसगावकर आणि निक्की तंबोलीमध्ये शाब्दिक वाद होतोहेत. आता निक्कीने बिग बॉसमध्ये एक पोस्टर दाखवत कोपरखळी मारली. वर्षा उसगावकर, डीपी, अरबाज, निक्की तंबोलीसह घरातील अन्य सदस्य बिग बॉसच्या समोर बसतात. त्यावेळी होस्ट रितेश देशमुख देखील उपस्थित असतो.
तेव्हा रितेश देशमुख म्हणतो- डॉक्टर निक्की..गुडघ्यात मेंदू... तुमच्या मते कुणाचा गुडघ्यात मेंदू आहे. यावर निक्की म्हणते की, मला द्यायचं आहे एका व्यक्तीला. म्हणून मला काही सांगायचे नाही. पण, तुम्ही म्हणणार की मी अनादर करते.
यावर रितेश देशमुख प्रतिक्रिया देतो की, निक्की, तुम्ही खेळ प्रामाणिकपणे खेळा. निक्की म्हणते-ताई. कारण त्या काही विषय खूप ताणतात. यावर पुढील गेम काय असणार? याकडे लक्ष लागले राहिले आहे. वर्षा ताई आणि निक्की तंबोली यांच्यातील वाद संपुष्टात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल.