निक्की तंबोलीला खडेबोल ऐकावे लागणार?  Instagram
मनोरंजन

BBM 5 - भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर खडेबोल सुनावणार?

निक्की तंबोलीला ऐकावे लागणार खडेबोल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दिवसेंदिवस बिग बॉस मराठीच्या घरात नवं काहीतरी घडत आहे. रोज काही ना काहीतरी गोंधळ झालेला दिसतो आहे. आता निक्की तंबोलीच्या दादगिरीवर होस्ट काय हालचाल करणार, याकडे लक्ष आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर खडेबोल सुनावणार आहे. याआधीही रितेश देशमुखकडून निक्कीला बोल ऐकावे लागलेच आहेत.

आता बिग बॉस मराठीच्या घारात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्की तंबोलीला मोडलेल्या स्टुलवर बसवणार आङे. आणि तिला तिची जागा दाखवून देणार आहे. त्यामुळे निक्कीचा पारा चढणार की, आणखी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'बिग बॉस मराठी' घरात सदस्यांमधील भांडण, वादावादी, अपमान अशा सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांचा या शोला चांगला प्रतिसाद आहे. पण काही सदस्यांचे उर्मठ वागणे हे बिग बॉसला काही पचनी पडले नाही. शिवाय प्रेक्षकांनाही ते नको होतं.

आता आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सर्वांची शाळा घेताना दिसेल. गणपती स्पेशल एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेतो, हे पाहणे रंजक ठरेल. निक्कीला होस्टकडून ऐकून तर घ्यावं लागणारचं आङे. पण, त्यानंतर निक्की काय करेल, ती काय बोलणार, हेही पाहणे, रंजक ठरेल.

निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवणार रितेश भाऊ

भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवणार आहे. तिची जागा तिला दाखवून देणार आहे. रितेश भाऊ निक्कीला म्हणाला की,"या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतलं. प्रत्येकाला त्रासाला सामोरं जावं लागलं. तुम्ही महाराष्ट्रातील ११ कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिलाय. असं करुन लोकांचं मनोरंजन होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. निक्की तुम्हाला बिग बॉसची आणि प्रेक्षकांची किंमत नाही. घरातील सदस्यांची तुम्ही किंमत ठेवत नाही. तुमचे स्वत:चे वेगळेच नियम या गरात आहेत. तुम्ही या आठवड्यात सर्वांची माफी मागायला हवी".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT