माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर... रजत दलालवर भडकली एकता कपूर  Rajat Dalal Ekta Kapoor
मनोरंजन

BB18: माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर... रजत दलालवर भडकली एकता कपूर

माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर... रजत दलालवर भडकली एकता कपूर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ; बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला छोट्या पडद्यावरील बिग बॉस १८ शो खुपच रंगला आहे. याशोमधील नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. आता हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार नसून बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूर आणि रोहित शेट्टी करणार आहेत. मात्र, बिग बॉस १८च्या घरात एकता कपूर आल्या- आल्या बरोबर तेथील स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यात तिने खास करून अभिनेत्री चाहत पांडे आणि रजत दलालवर भडकली आहे.

अभिनेत्री एकता कपूर तिचा आगामी सिनेमा 'द साबरमती रिपोर्ट'च्या प्रमोशनसाठी बिग बॉस १८मध्ये पोहोचली आहे. यामुळे आजच्या भागात फुल ऑन ड्रामा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शोचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एकता कपूर अभिनेत्री चाहत पांडे आणि रजत दलालसह सर्वांचा क्लास घेताना दिसली आहे.

एकताने स्पर्धक चाहतवर भडकत म्हटलं आहे की, 'मी तुम्हाला सांगते की, तुम्ही येथे एक स्पर्धक (खेळाडू) आहात. तुम्ही या घरातल्या स्त्री-पुरुषांबद्दल वाईट बोलू शकत नाही. सर्वाचा आदर ठेवला गेला पाहिजे, तू माझ्याशी असं कसं बोलू शकतेस.'

माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर...

यानंतर एकता घरातील स्पर्धक रजत दलालवर भडकली आणि म्हणाली की, 'तुझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीसमोर गर्वाने उभा आहेस, तू काही तोफ नाहीस.... तु फक्त तुझी ताकद दाखवत आहेस. जर तु माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर मी तुला याचा अर्थ समजावून सांगायला आणि तूला धडा शिकवायला घरात आले असते. तू माझ्या वडीलांना काहीही बोलू शकत नाहीस.' एकताचे हे बोलणे ऐकून रजतने मौन पाळले आहे.

चाहत आणि रजत दलालसोबत विवियन डिसेनाचा तिने चांगलाच क्लास घेतला. हा एक प्रोमो होता. तर प्रत्येकक्षात बिग बॉसमध्ये आल्यावर एकता कपूर आणखी काय-काय करणार यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT