मुंबई : पुढारी ऑनलाईन
दंगल गर्ल सान्या मल्होत्राचा २५ फेब्रुवारीला वाढदिवस. आज ती २९ वर्षांची झाली आहे. सान्यासाठी हा दिवस खूप खास आहे. कारण, तिच्या वाढदिवसादिवशी तिचा आगामी चित्रपट 'पगलैट'ची घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
'पगलैट' एक कॉमेडी ड्रामा आहे. उमेश बिष्ट यांनी दिग्दर्शित केला असून सान्या मल्होत्रा संध्याचे पात्र साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात संध्याच्या पतीचा मृत्यू होतो, असे दाखवण्यात येणार आहे. अशा दुर्घटनेनंतर लोक दु:खी होतात. परंतु, संध्या नाही.
एकता कपूर, शोभा कपूर, गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी चित्रपट 'पगलैट'ची घोषणा २०१९ मध्ये केली होती. कोरोनामुळे चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम थांबले होते. पुढे मोठे चित्रपट आल्याने हा चित्रपट रिलीज होण्यास वेळ लागला.
वाचा – बेळगावी रतीला पाहून चाहते म्हणाले, सेक्सी बॉन्ड
आता 'पगलैट' ओटीटी प्लॅटफॉर्मवर २६ मार्चला रिलीज होईल. सान्या मल्होत्रा 'पगलैट'मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री श्रुती शर्माचीही मुक्य भूमिका आहे. सध्या शर्मा 'नमक इस्क का' मालिकेत काम करत आहे. सायोनी गुप्ता, आशुतोष राणा, रघुवीर यादव, शीबा चड्ढा आणि राजेश तेलंग यासारख्या कलाकारांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. सान्या मल्होत्राने 'बधाई हो', 'दंगल' यासारखे चित्रपट केले आहेत. ती 'शकुंतला देवी' आणि 'लूडो' चित्रपटातही दिसली होती.
वाचा – रश्मिका मंदानाच्या चित्रपटातील १४ वादग्रस्त सीन हटवले