Bads of Bollywood actor Lakshya Lalwani leaves tv job
मुंबई - बॉलिवूडवरील नव्या वेब सिरीज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सध्या चर्चेत आहे. आर्यन खानच्या या सीरीजमध्ये दाखवले जाणारे कथानक, स्टारकास्ट आणि त्यामागील त्यांची कहाणी जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, या सीरीजमधील एका अभिनेत्याने नव्या भूमिकेसाठी टीव्हीवरील नोकरी सोडली होती. या अभिनेत्याचे नाव आहे- लक्ष्य ललवानी. सध्या त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
रिपोर्टनुसार, या अभिनेत्याला टीव्ही इंडस्ट्रीत दिवसाला तब्बल २५ हजार रुपये मानधन मिळत होते. पण नवी भूमिका मिळाल्यानंतर त्याने टीव्हीवरील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय यशस्वी ठरला आणि त्याला खरी ओळख द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून मिळाली, असे म्हणायला हरकत नाही. या सीरीजमधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आहे.
'वॉरियर हाय', 'अधुरी कहानी हमारी', 'प्यार तूने क्या किया', 'परदेस में है मेरा दिल', 'पोरस' यासारख्या मालिकांमध्ये तो दिसला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना लक्ष्यने सांगितले की, द बॅड्स ऑफ बॉलिवूडसाठी तो टीव्ही इंडस्ट्रीतून बाहेर पडला.
त्याने पुढे सांगितले की, 'मी टीव्हीतून १५ ते २५ हजार रुपये रोज कमावत होतो. मला माहिती होतं की, जर आता मी उडी नाही मारली तर कधीही उडी मारु शकणार नाही.'
लक्ष्यने आपल्या वडिलांसोबत बातचीत केल्याचे सांगितले. लक्ष्य म्हणाला की, माझे वडील म्हणाले-'तू जेवढा आकडा सांगत आहेस, तू जेवढे रोज कमावतोस ती माझी महिन्याची कमाई आहे. तुला चालेल्या मार्गावर जर तुला विश्वास असेल तर जा.'
लक्ष्यला नुकताच संजय लीला भन्साळींच्या मुंबई ऑफिस बाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यावरून अंदाज लावला जात आहे की, तो भन्साळींच्या पुढील प्रोजेक्टमध्ये सहभागी होईल. अनन्या पांडे सोबत रोमँटिक ड्रामा 'चाँद मेरा दिल' मध्येही तो दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.