मुंबई - सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर नव्या पर्वासह - 'बडे अच्छे लगते हैं' मालिका भेटीला येतेय. हा नवा सीझन प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या शुद्ध आणि हळव्या प्रेमाची अनुभूती देणार आहे. जेव्हा एखाद्याला खऱ्या अर्थाने ‘आपला’ वाटणारा व्यक्ती भेटतो. ही कथा असे गोड क्षण, हळुवार भावना आणि प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाची मिठास पुन्हा अनुभवायला लावेल.
‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका फक्त एक कथा नाही, ती एक भावना आहे, जी अनेक पिढ्यांमध्ये पोहोचली आहे. या नव्या सीझनमध्ये ‘ऋषभ’ची भूमिका साकारत असलेले अभिनेता हर्षद चोपडा म्हणाला, “या नव्या सीझनसह प्रेक्षकांना पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर सच्च्या प्रेमाची अनुभूती होईल. हा शो नेहमीच प्रेमाचा उत्सव साजरा करत आला आहे, पण या वेळेस आपण ते हरवलेलं जिवंत आणि हृदयस्पर्शी प्रेम पुन्हा दाखवणार आहोत. आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत हे सीझन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला.”
‘भाग्यश्री’ची भूमिका साकारत असलेली शिवांगी जोशी म्हणाली, “मी अत्यंत उत्साहित आहे ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या सीझन’ प्रेक्षकांपुढे सादर करताना. या शोने टेलिव्हिजनवर प्रेमाची व्याख्या बदलली आहे. या आयकोनिक शोचा भाग होणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि आनंद आहे, आणि मी आशा करते की प्रेक्षकांना हा नवा पर्व सुद्धा तेवढाच प्रिय वाटेल.”
‘बडे अच्छे लगते हैं – नवा सीझन’ ची सुरुवात होत आहे. १६ जूनपासून, सोमवार ते शुक्रवार, रात्री ८:३० वाजता होणार आहे.