मुंबई : बॉलीवूडमध्ये मुदस्सर अजीज सोबत एक चित्रपट येतोय, ज्यामध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असेल. विशेष म्हणजे चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. तीन अभिनेत्रींसोबत या चित्रपटात आयुष्मान रोमान्सचा तडका लावताना दिसणार आहे.
आयुष्मान खुरानाच्या फॅन्सना त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा होती. मध्यंतरी एक वृत्त आले होते की, एका कॉमेडी चित्रपटासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक मुदस्सर अजीज सोबत त्याने हातमिळवणी केली होती. आता या नव्या चित्रपटाचे नाव पती, पत्नी और दो असे ठेवण्यात आले आहे.
या चित्रपटाची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार आहे. निर्माते शूटिंग सप्टेंबर, २०२५ मध्ये सुरु करणार असल्याची माहिती समोर आलीय. २०२६ च्या दुसऱ्या सहा महिन्यात हा चित्रपट रिलीज केला जाईल.
आयुष्मान खुरानाकेड हॉरर कॉमेडी 'थामा' चित्रपट देखील आहे. याआधी आयुष्मानचा 'बाला' बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. २५ कोटी बजेट चित्रपटाने जवळपास १७२ कोटी रुपयांचे वर्ल्डवाईड एकूण कलेक्शन केले होते.