radhe maa blessed Avika Gor-Milind  Instagram
मनोरंजन

Avika Gor: 'धमाल विथ पति पत्नी और पंगा' | अविका गौरने राधे मांचे घेतले आशीर्वाद, भडकले लोक

Avika Gor- 'धमाल विथ पति पत्नी और पंगा' | अविका गौरने राधे मांचे घेतले आशीर्वाद, भडकले लोक

स्वालिया न. शिकलगार

radhe maa blessed Avika Gor-Milind before marriage

मुंबई - ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा नवा शो पति पत्नी और पंगा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याच्या प्रमोशनसाठी ती सध्या व्यस्त आहे. मात्र, या शोच्या प्रमोशनदरम्यान अविकाने केलेल्या एका कृतीमुळे मोठा वाद उभा राहिला आहे.

अविका गौरने अलीकडेच राधे मांचे आशीर्वाद घेतले. तिचे राधे मांसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये ती राधे मांचे चरण स्पर्श करताना दिसते. हे फोटो समोर आल्यानंतर अनेक नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तिला “फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं करत आहेस” अशी टीका केली तर काहींनी “अविकाकडून अशी अपेक्षा नव्हती” असेही लिहिले.

'धमाल विद पति पत्नी और पंगा'च्या राधे मांने एन्ट्री घेतली. अभिनेत्री अविका गौर आणि मिलिंद चांदवानीने आपल्या लग्नाची पत्रिका राधे मा ला दाखवले. त्यांचे लग्न ३० सप्टेंबरला होणार आहे.

अविका गौरने आपल्या इन्स्टाग्रामवर राधे मांचे आशीर्वाद घेतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. पण त्यांनंतर काही नेटिझन्स नाराज झाले. राधे मां ला शोमध्ये कशासाठी आणलं गेलं? असा सवालही विचारण्यात आला. शोमध्ये येऊन राधे मा म्हणाली, 'पति पत्नी और पंगा टीमसोबत धमाल करून मला खूप आनंद झाला. अविका आणि मिलिंदच्या लग्नासाठी मी त्यांना मनापासून आशीर्वाद देते, त्यांची जोडी खरंच सुंदर आहे.'

शोमध्ये राधे मां ला पाहून भडकले लोक

फोटोंवर खूप टीका झाली. अनेकांनी संतापजनक कॉमेंट्स देखील केले. एकाने म्हटलं की, सिटी स्टंट, हा आमचा रा विकास, असे कलाकार...''

लग्नाआधी बाप्पांचे दर्शन

अविका - मिलिंदने गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर जाऊन दर्शन घेतसे. ते म्हमाले की, 'मिलिंद आणि मला हे सांगताना आनंद होत आहे की. आम्ही ३० सप्टेंबरला नवरात्रीच्या पवित्र दिवसात लग्नबंधनात अडकणार आहोत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT