मुंबई - जेम्स कॅमेरूनचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' ज्यांना पाहता आला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी आहे. चित्रपटगृहात हा सिनेमा पाहता येणार आहे. ३ वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला. १६ डिसेंबर, २०२२ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात वर्थिंगटन, जो सलदाना आणि सिगोरनी वीवर मुख्य भूमिकेत आहेत. पेंडोराची ही कहाणी प्रेक्षकांसोबत समीक्षकांना देखील अधिक भावली होती.
२ ऑक्टोबर, २०२५ रोजी दसऱ्यानिमित्त 'अवतार: द वे ऑफ वॉटर' पुन्हा रिलीज झाला. केवळ एका आठवड्यासाठी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना या फ्रेंचायजीचा तिसरा भाग 'अवतार: फायर अँड ॲश'चे पहिले प्रीव्ह्यू पाहायला मिळेल. जो १९ डिसेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिली ज होईल.
अवतार: फायर अँड ॲश रिलीजच्या आधी ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. डिज्नी आणि ट्वेंटिएथ सेंच्युरी स्टुडिओजने "अवतार : फायर अँड ॲश"ची शानदार झलक दाखवली. एक अद्भुत विज्ञान-फाय फँटेसी फ्रेंचायजीचा तिसरा भाग आहे, जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५ बिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे.