हॉलीवूडचा बहुप्रतिक्षित ‘अवतार: फायर अँड ॲश’ चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर *‘धुरंधर’*ला टक्कर देण्यात अपयशी ठरला आहे. भव्य तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी आणि मोठे बजेट असूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका मिळालेला नाही. उलट, ‘धुरंधर’ने मजबूत कथा आणि स्थानिक कनेक्टमुळे आघाडी कायम ठेवली आहे.
जेम्स कॅमेरूनचा चित्रपट रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ला टक्कर देण्यात अपयशी ठरला. जेम्स कॅमेरॉनचा महाचित्रपट 'अवतार: फायर अँड ॲश' भारतात 'धुरंधर'च्या क्रेझदरम्यान रिलीज झाला होता. रिलीज होण्यापूर्वी धुरंधरला अवतार टक्कर देणार, असा कयास लावला जात होता. हा चित्रपट भारतातील बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटाची घोडदौड थांबवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा हॉलिवूड ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट तसे करण्यात अयशस्वी ठरला आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी अवतार फायर अँड ॲश चित्रपट कमाईवर एक नजर..
हॉलीवूडचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अवतार: फायर अँड ॲश’ रिलीज झाला असला, तरी बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी निराशाजनक ठरत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ‘धुरंधर’समोर फारसा टिकाव धरू शकलेला नाही.
अवतार मालिकेच्या आधीच्या भागांनी जगभरात प्रचंड कमाई केली होती. अत्याधुनिक VFX, भव्य कथा आणि वेगळ्या विश्वाची ओळख हे या मालिकेचे वैशिष्ट्य राहिले आहे. फायर अँड ॲशमध्येही हीच भव्यता पाहायला मिळते. तरीसुद्धा, चित्रपटाची कथा अपेक्षेइतकी प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळतेय.
दुसरीकडे, भारतात रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने सर्वांची बोलती बंद केलीय. या चित्रपटाने मात्र पहिल्याच आठवड्यात जोरदार कमाई करत आघाडी घेतली आहे. शानदार अभिनय, दमदार कथा आणि प्रभावी डायलॉगमुळे ‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर चलती आहे. अवतार: फायर अँड ॲशच्या शोसाठी स्क्रीन मिळूनही अपेक्षित कमाई करता आलेली नाही.
अवतार फायर अँड ऍशने किती कमावले?
पहिल्या दिवशी १९ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २२.५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २५.७५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ९ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ९.२५ कोटी रुपये, सहाव्या दिवशी १०.२५ कोटी रुपये. एकूण : ९५.७५ कोटी रुपये असे कमाईचे आकडे आहेत.
१००० कोटींच्या क्लबमध्ये लवकरत समाविष्ट होणार धुरंधर
रणवीर सिंह - अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट रिलीज होऊन २० दिवस झाले आहेत. हा चित्रपट आता १ हजार कोटींच्य क्लबमध्ये समाविष्ट होण्यासाठी तयार आहे. 'धुरंधर'ने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर २० व्या दिवशी बुधवारी 'ॲनिमल', 'बजरंगी भाईजान'चे रेकॉर्ड मोडले आहे. बजरंगी भाईजानचे लाईफटाईम कलेक्शन ९१८.१८ कोटी होते.
धुरंधर ने बुधवारी एका दिवसामध्ये एकूण ३३ कोटींचा बिझनेस केले. या चित्रपटाला १ हजार कोटींमध्ये समाविष्ट होण्यासाठी ६५ कोटींची आवश्यकता आहे.