बालकलाकार मीरा शेडगेच्या अत्तर लघुपटाची निवड झाली  Instagram
मनोरंजन

ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवलमध्ये 'अत्तर'ची निवड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - ईशान्य आफ्रिकेतील इजिप्त देशातील महत्वाचा मानला जाणारा ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये "अत्तर" या कलाकृतीची निवड झाली. चित्रपट महोत्सव ए. आय. शोरूक, न्यू कैरो, गव्हर्नरेट, इजिप्त या ठिकाणी १४ ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहे.

गटारात (मॅनहोल) मध्ये काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न हा जगभर आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला द्यायची आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी त्या मुलीच्या संघर्षाची कहाणी 'अत्तर' यामध्ये दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.

ब्रिटिश युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टुडेंट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अत्तरची निवड होणे याचा खूप आनंद आहे. आम्ही केलेल्या कलाकृतीला जगाच्या पाठीवर निवड होणे. त्यांना आवडणे आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. असे चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि निर्माते राजू लुल्ला यांनी सांगितले.

अत्तरमध्ये बालकलाकाराच्या प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे आहे. याआधी ती काही जाहिरातीमध्ये काम करताना दिसली होती. अत्तर या लघुपटाची निर्मिती राजू लुल्ला यांनी केली आहे.

द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि रुहानी म्युझिक निर्मित असलेल्या 'अत्तर'चे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 'अत्तर' खूप महत्वाची भूमिका बजावत असते. 'अत्तर' जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सुगंधाची दरवळ हेच 'अत्तर' अनेकांचे आयुष्य सुगंधी करते. सुगंधी 'अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे. जगभरातील ६० देशात "अत्तर" लघुपटाचा दरवळ रसिकांपर्यंत पोहोचला आहे. अजून जगभरातील कानाकोऱ्यातील लघुपट महोत्सवात अत्तर लघुपट गेला असून रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेणारं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT