Punha Ekda Sade Made Teen teaser out  Punha Ekda Sade Made Teen
मनोरंजन

Punha Ekda Sade Made Teen | अशोक-मकरंद-भरत करणार धमाका! पण ‘नो लेडीज, नो मॅरेज’ नियम मोडायला येतेय 'ती' (Teaser)

Marathi Cinema | हशांचा महापूर येणार! मराठी कॉमेडीचे तीन दिग्गज एका चित्रपटात

स्वालिया न. शिकलगार

मराठी सिनेमातील कॉमेडीचे बादशाह अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव हे तिघे एकत्र येत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘नो लेडीज, नो मॅरेज’ या भन्नाट नियमावर आधारित या आगामी चित्रपटात एका रहस्यमय ‘ती’च्या आगमनामुळे संपूर्ण कथेला मजेशीर वळण मिळणार आहे.

Punha Ekda Sade Made Teen teaser released

मराठी सिनेसृष्टीत जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो, तेव्हा अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव ही नावं हमखास आठवतात. आता हे तीनही दिग्गज कलाकार एका नव्या मराठी चित्रपटातून एकत्र येणार आहेत. प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. चित्रपटाच्या कथेनुसार, लग्न आणि महिलांविषयी एक विचित्र नियम पाळणारे काही पात्रे या कथेत आहेत.

त्यांच्या आयुष्यात महिलांना कोणतंही स्थान नाही आणि लग्न म्हणजे एक डोकेदुखी, असं त्यांचं ठाम मत आहे. मात्र या सगळ्या नियमांना सुरुंग लावण्यासाठी कथेत एका रहस्यमय ‘ती’चा प्रवेश होतो आणि त्यानंतर सुरू होतो धमाल, गोंधळ आणि हास्याचा सिलसिला.

अशोक सराफ आपल्या खास टाइमिंग आणि अभिनयशैलीसह पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. मकरंद अनासपुरे आपल्या ग्रामीण ढंगातील विनोदाने रंगत वाढवताना दिसणार आहेत, तर भरत जाधव आपल्या सहज अभिनयाने कथेला वेगळं वळण देणार आहेत. या तिघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणं हेच प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे.

कोण आहे 'ती'?

या त्रिकुटांच्या आयुष्यात एका स्त्रीची एंट्री होते ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या रिलीज झालेल्या टीझरमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतंय. रतन, मदन, चंदन आणि बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री झाली आहे. कामिनी अर्थातच रिंकू रागुरु असेल, असे चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसते. कामिनीच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात काय गोंधळ उडमार, याची झलक टीझरमध्ये दिसतेय.

कुरळे ब्रदर्सची गँग शिस्तप्रिय भावंडं...पण बिनधास्त कामिनीची एंट्री त्यांच्यात झालीय. कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस स्वभाव असलेला चंदन अशा भिन्न स्वभावांच्या भावांसोबत कामिनी काय धमाल उडवून देणार हे रंजक ठरणार आहे.

पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या मोठ्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान असलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.
-रिंकू राजगुरू, अभिनेत्री

अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन निर्मित चित्रपट आहे. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट हे सहनिर्माते आहेत. तर स्मिथ पीटर तेलगोटे सहाय्यक निर्माते आहेत.

कोण आहेत कलाकार?

या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव असे एकापेक्षा एक कलाकार आहेत. अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा, असून संकेत पाठक, संजय नार्वेकर, समृद्धी केळकर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव यांनी केले आहे. येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT