Arjun Kapoor, Sonakshi Sinha 
मनोरंजन

सोनाक्षी सिन्हाबाबत आजही आदर : अर्जुन कपूर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कधी काळी सोनाक्षी सिन्हासोबत नात्यात होता. 'तेवर' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी त्यांच्यात रिलेशनशिप असल्याची अफवा पसरली होती; परंतु सिनेमा पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे नाते संपले होते. एका मुलाखतीत आता अर्जुनने याबाबत भाष्य केले आहे.

अर्जुन म्हणाला की, काही नाती टिकून राहतात तर काही टिकत नाहीत. एकदा सिनेमा पूर्ण झाला की, लोकांना त्यांच्या वेगळ्या मार्गाने जावे लागते. मला अजूनही सोनाक्षी सिन्हाबद्दल आदर आहे. आम्ही एखाद्या सोहळ्यात भेटतो. त्यावेळी नाते चांगले राहण्यासाठी प्रयत्न करतो. अनेकांच्या माहितीप्रमाणे सोनाक्षीलाही अर्जुनबरोबर बराच वेळ घालवायचा होता, त्यामुळे सततची जवळीक आणि वारंवार येणारे कॉल्समुळे अर्जुनला काहीसे गुदमरल्यासारखे वाटायचे. त्यांच्या ब्रेकअपसाठी दोघांपैकी एकाला दोष देणे योग्य नाही.

आता सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी 23 जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच सोनाक्षी आणि अर्जुनच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT