अरबाज खान आणि शूरा खान यांनी त्यांच्या मुली सिपारा खान हिच्या हाताचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. “हृदयाचा सर्वात मोठा भाग” असे म्हणत पोस्ट केलेला हा फोटो व्हायरल झाला असून चाहत्यांनी दोघांवर आणि या छोट्या परीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. खान कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण असून आगामी अपडेट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
Arbaaz-Sshura Khan daughter Sipaara first photo
मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा नंतर अरबान खान आणि त्याच्या पत्नीने शूरा खानने देखील आपल्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर आणली आहे. त्यांची मुलगी सिपारा खानच्या चिमुकल्या हाताचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सिपाराचे काही फोटो अरबाजने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शूराने ऑक्टोबरमध्ये नन्ही परीला जन्म दिला होता.
अरबाज आणि शूराने आपल्या मुलीचे दोन खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. पण, आतापयर्ंत त्यांनी तिचा चेहरा आतापयर्ंत दाखवलेला नाही. या फोटोंमध्ये छोटी-छोटी झलक दिसते. पहिल्या फोटोमध्ये अरबाजने मोठ्या प्रेमाने आपल्या मुलीचे पाय हातात घेतला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये सिपाराने आपल्या छोट्या हाताने अरबाज च्या अंगठ्याला पकडले दिसते.
अरबाज आणि शूराने हे फोटो शेअर एक भावूक कॅप्शन लिहिले, "छोटे हात आणि छोटे पाय, पण आमच्या हृदयाचा मोठा हिस्सा आहे सिपारा खान."
अरबाज खान आणि शूरा खानने २०२३ मध्ये लग्न केले होते. ते आधी काही काळ रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर ते विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात केवळ परिवारातील काही लोक आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी झाले होते.
नुकताच खान परिवारने आई - वडील सलीम-सलमा यांच्या लग्नाचा ६१ वा वाढदिवस साजरा केला आहे. दरम्यान अरबाज खान आणि शूरा खानने आपल्या नन्ही परी सिपाराचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे कपल ऑक्टोबरमध्ये आई-वडील झाले होते. त्यांनी मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी बाळाच्या नावाचा खुलासा केला होता.