Apoorva Nemlekar wrote emotional post on social media  pudhari photo
मनोरंजन

Apurva Nemlekar |'कधीकधी वाट पाहावी लागते, कारण आशीर्वाद त्याहुनही मोठा असतो'; आयुष्यातील नव्या पर्वाबद्दल अपूर्वाची पोस्ट चर्चेत

Apoorva Nemlekar | 'कधीकधी प्रचंड वाट पाहावी लागते, कारण मिळणारा आशीर्वाद त्याहुनही मोठा असतो'

स्वालिया न. शिकलगार

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही खास क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिची एक नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक संदेश शेअर केला आहे.

"Sometimes the wait is longer because the blessing is bigger." म्हणजेच "कधीकधी प्रचंड वाट पाहावी लागते, कारण मिळणारा आशीर्वाद त्याहूनही मोठा असतो", असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. या एका वाक्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच अपूर्वा नेमळेकर विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. चाहत्यांनी तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छांचाही वर्षाव केला होता. अशातच तिने केलेली ही पोस्ट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अपूर्वाच्या या संदेशाचा नेमका संदर्भ तिच्या भूतकाळाशी जोडला गेला आहे. आयुष्यातील एख वैवाहिक पर्व संपुष्टात आल्यानंतर जगताना मानसिक, शारीरिक सर्वच पातळीवर ज्या आव्हानांना, अडचणींना सामोरे जावे लागले, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जितकी प्रतीक्षा करावी लागली...आयुष्यातील संघर्ष, स्वप्नांची पूर्तता किंवा वैवाहिक आयुष्यातील आनंददायी टप्पा या गोष्टीशी संबंधित ही फोटो पोस्ट आहे, असे म्हणायला हरकत नाही.

तनुज गोवळकरसोबत ती लग्नबंधनात अडकलीय. तिने ही पोस्ट लिहिताना एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये तिचा पती पाठमोरा उभा असल्याचे दिसते आहे. अपुर्वाने समोरुन कॅमेरासाठी फोटो पोझ दिलीय. ज्यामध्ये तिचे आशादायी भाव दिसताहेत. आयुष्यात संयम आणि सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अपूर्वाने अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या दमदार अभिनयामुळे तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT