मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे लग्नबंधनात अडकली असून तिच्या लग्नातील खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पारंपरिक ब्राइडल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून काही भावनिक क्षणही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फोटोंना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Apurva Gore wedding album viral
मराठी अभिनेत्री अपुर्वा गोरेने आपल्या लग्नातील खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अपुर्वाने लाल साडीतील फोटो फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. त्यामध्ये तिने माझ्यासवे आहेस तु, मजला पुरे ही सार्थता…! ApurvAnsh अशी कॅप्शन लिहित रेड हार्ट इमोजी आणि एविल आयचा इमोजी शेअर केला आहे.
या जोडीचे खास आनंदाच्या क्षणांचे फोटो कॅमेराबद्ध करण्यात आले. मुंडावळ्या, साजेसे दागिने, हिरवा चुडा, ला साडी आणि पिवळा शेला तर तिचा पती अंशुमन जोशीने कुर्ता -धोतर परिधान केल्याचे दिसते.
मंगलाष्टका आणि दोघेही पारंपरिक वेशभूषेत खूपच सुंदर दिसताहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये अपुर्वाने गुलाबी काठ असलेली हिरवी साडी नेसली होती. तर अंशुमनने पांढरा कुर्ता आणि पिवळे धोतर परिधान केले होते. अपुर्वाचा हा कमालीचा ब्राडल लूक शोभून दिसला.
लग्नातील काही भावनिक क्षणही या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत आहेत. त्यामुळे हे फोटो अधिकच खास ठरले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
अपूर्वा गोरे ही मराठी मनोरंजन विश्वातील ओळखीची अभिनेत्री आहे. तिने विविध मालिका आणि प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट करून तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.