नवी दिल्ली : प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने केलेल्या एका विधानाने फिल्म निर्मांत्यांना चांगलीच चपराक बसली आहे. अनुराग कश्यप हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहत असतात. आता त्यांनी ‘पॅन इंडिया’ या शब्दावरुन टिपणी केली आहे. पॅन इंडिया हा शब्द माझ्यासाठी एक महाघोटाळा आहे असे ते म्हटले आहेत.
कश्यप यांच्या मते निर्माते हे एकाच गोष्टीच्या पाठीमागे लागलेले असतात. एकाच पठडीतील चित्रपटांवर मोठ्या प्रमाणावर पैसा लावला जातो. अशा चित्रपटांमुळे कथामूल्य हरवत चालले आहे. कथा नसलेले फक्त प्रेक्षक कसे खेचले जातील यासाठी मालमसाला घातलेले चित्रपट बनत आहेत. त्यामुळे अनेक निर्माते हे नुकसान सहन करत आहेत. पॅन इंडिया चित्रपट बनवन्याच्या नादात अनेक निर्माते तोंडघशी पडत आहेत. यासाठी त्यांनी बाहुबली, केजीएफ सारख्या चित्रपटांचे उदाहरण दिले.
खरा चित्रपट तेव्हांच पॅन इंडिया होतो तेव्हा तो सर्व देशभरात चांगली कामगिरी करतो. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो. अनेकांचे हात निर्मितीमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे निर्मितीसाठी लागलेला पैसा केवळ सेट उभे करण्यासाठी आणि लोकेशन्ससाठी जातो याला काहीच अर्थ नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप यांनी अनेक मुद्यांना हात घातला. ते पुढे म्हणाले की काही असे चित्रपट यशस्वी झाले आहेत की ज्यांचा कोणी विचारही केला नसता. तसेच भारतात चित्रपटांची लाट येत असते असेही ते म्हणो. कोणत्याही विषयावरील चित्रपट यशस्वी झाला की तसेच चित्रपटांची निर्मिती सुरु होते. स्त्री २ हिट झाली त्यानंतर देशभरात हॉरर कॉमेडीची लाट आली. उरी यशस्वी झाली तेव्हा देशप्रेमावर चित्रपट येऊ लागले. बाहूबलीनंतर, केजीफनंतर त्याच धाटणीचे चित्रपट येऊ लागले. असेही त्यांनी सांगितले. अशा लाटेमुळे चित्रपटातून कथा हरवत गेली असेह त्यांनी नमूद केले.
कोणतीही चांगली कथा निर्माते घेत नाहीत, त्याऐवजी आयटम साँगवर त्यांचा भर असतो. चित्रपट चालावा यासाठी निर्माते असे फॉर्म्यूले वापरतात कारण त्यांना ८०० - ९०० - १००० करोड असे आकडे गाठायचे असतात. पण दरवर्षी देशभरात १००० च्या वर चित्रपट बनतात पण अगदी बोटावर मोजण्याएवढे चित्रपट तिथेपर्यंत पोहचतात. पॅन इंडिया यशस्वी होण्याच्या नादात अनेक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.