अंशुला कपूरच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात झाली असून त्यातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या सोहळ्यात जान्हवी कपूरसह कपूर कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. पारंपरिक पोशाखातील त्यांचे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
बोना कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिच्या घरी सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर त्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूरसह कपूर कुटुंबातील अनेक सदस्य सहभागी झाल्याचे दिसतात.
अंशुलाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पोशाख परिधान केले होते. रंगीबेरंगी वातावरण, सुंदर सजावट आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेषतः जान्हवी कपूरचा आकर्षक पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
कपूर कुटुंबातील सदस्यांनी या सोहळ्यात एकत्र येत आनंद साजरा केला. कुटुंबासोबतचे अनेक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
अंशुला तिचा लॉन्गटाईम बॉयफ्रेंड रोहन ठक्कर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आठ महिन्यांपूर्वी या कपलने साखरपुडा केला होता आणि आता दोघे लवकरच विवाहबंधनात अडकतील.
अंशुलाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिची चुलत बहीण, अभिनेत्री शनाया कपूरने या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शनायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कपूर फॅमिलीचे फोटो शेअर केले आहेत.