Anoushka Shankar angry on air india  Instagram
मनोरंजन

Anoushka Shankar | जास्तीचे पैसे देऊनही सितार तुटल्याने अनुष्का शंकरचा संताप, शेअर केला व्हिडिओ

Anoushka Shankar | जास्तीचे पैसे देऊनही सितार तुटल्याने अनुष्का शंकरचा संताप, शेअर केला व्हिडिओ

स्वालिया न. शिकलगार

anoushka shankar shared video air india sitar damaged

दिवंगत महान सितारवादक रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर देखील एक सितारवादिका आहे. अनुष्का शंकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या प्रवासादरम्यान तिची सितार तुटल्याचा हा व्हिडिओ आहे.

‘एअर इंडिया’ प्रवासानंतर एका धक्कादायक घटनेची तिने माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, एअर इंडियाच्या फ्लाईटमधून येताना तिचा सितार जास्तीच्या रकमेने ‘हँडलिंग फी’ भरून दिल्यानंतरही तुटला आणि या प्राकारानंतर ती नाराज झालीय.

अनुष्का व्हिडिओमध्ये पुढे म्हणाली, "सुरुवातीला, मी माझ्या सितारच्या वरच्या भागाकडे पाहत होते आणि मला जाणवले की ते खरोखरच ट्यूनमध्ये नाही. ट्यून दुरुस्त केल्यानंतर, मी ते वाजवण्यासाठी उचलले आणि तेव्हाच मला कळले की ते पूर्णपणे तुटलेले आहे. म्हणजेच सिताराला गंभीर नुकसान झाले होते."

एअर इंडियाला प्रश्न विचारत अनुष्का म्हणाली, तुम्ही हे कसे केले? माझा एक विशेष वर्ग आहे, तुम्ही हँडलिंग फी आकारता आणि तरीही तुम्ही हे केले? हा माझा पहिलाच अनुभव आहे इतक्या वर्षांनंतर एअर इंडियासोबत प्रवास केला. त्यामुळे हे अजिबात स्वीकारार्ह नाही.

या घटनेमुळे संगीतप्रेमींमध्ये आणि इतर कलाकारांमध्ये तिला मोठं समर्थन मिळाले आहे. अनेकांनी एअर इंडियाच्या ‘इन्स्ट्रुमेंट हँडलिंग’ पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत, आणि अशा नाजूक वाद्यांबरोबर प्रवास करताना अधिक दक्षतेची गरज असल्याचं सांगितलं.

तिने व्हिडिओसोबत एक कॅप्शन पोस्ट केलीय. त्यामध्ये लिहिले, "एअर इंडियाने माझ्या सितारचे जे केले त्याबद्दल मला खूप दुःख झाले आहे आणि मी खरोखरच अस्वस्थ आहे. असे नुकसान कसे होऊ शकते? हे आणखी दुःखद आहे कारण मला एअर इंडियाने प्रवास करून बराच काळ झाला आहे आणि असे दिसते की एक भारतीय वाद्य त्यांच्यासोबत सुरक्षित राहू शकत नाही, कारण मी इतर एअरलाइन्ससह हजारो उड्डाणे केली आहेत आणि एकही धून बिघडलेला नाही. आता हे सितार निरुपयोगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT