मनोरंजन

होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा : अंकुशला अश्रू अनावर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकुश चौधरी मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास 'मी होणार सुपरस्टार जल्लोष  ज्युनियर्सचा'च्या बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाले. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT