Ankita Walawalkar Vat Purnima 2025 video
मुंबई - बिग बॉस मराठी ५ मधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री, सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकरची लग्नानंतरची आजची ही पहिली वटपौर्णिमा आहे. तिने म्युझिक डायरेक्टर कुणाल भगतशी १६ फेब्रुवारीला कोकणात लग्न केले होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावात हा विवाह सोहळा पार पडला होता. या गावात लक्ष्मी-नारायणाचे सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी अंकिता-कुणाल यांची गाठ बांधली गेली होती. आता अंकिताचा वटपौर्णिमेचा एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे.
अंकिता वालावलकरने वटपौर्णिमे निमित्त सुंदर व्हिडिओ शूट केला आहे. अस्सल मराठी लूकमध्ये अंकिताचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. बेबी पिंक कलर नऊवारी पैठणी नेसलीय. त्यावर जरी वर्क केलेले क्रीम कलर ब्लाऊज, लांब मंगळसूत्र, हातात हिरव्यागार बांगड्या, नाकात साजेशी नथ, पायात सुंदर पैंजण, कंबरेला छल्ला, कानात सुंदर वेलांचे झुमके आणि केसांचा सुंदर अंबाडा असा लूक तिने केला आहे.
''नवरोबा आज माझ्यासोबत तुझाही उपवास आहे….छान वाटलं मला..खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील …. वटपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!''
तिने नेसलेल्या साडीच्या पदरावर सुंदर वडाच्या झाडाची एम्ब्रॉयडरी केलेली दिसते. तिच्या या व्हिडिओवर फॅन्सनी कॉमेंट्सची बरसात केलीय.