मनोरंजन

Ranbir Kapoor : आलिया भट्टच्या आधी रणबीरच्या आयुष्यात आल्या ‘या’ अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. दोघांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केलं आहे. आता हे दोघे या आठवड्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, रणबीरच्या (Ranbir Kapoor) आयुष्यात या अभिनेत्री येऊन गेल्या आहेत. रणबीरचे काही अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाले तर एका अभिनेत्रीला त्याने धोका दिल्याचेही म्हटले जाते.

अवंतिका मलिक

रणबीर आणि अवंतिका कॉलेज फ्रेंड्स आहेत. अल्पवयीन असताना दोघांनी एकमेकांना डेट केले होते.

नंदिता महतानी

नंदिता आणि रणबीरने एकमेकांना डेट केल्याचे म्हटले जाते. ही जोडी चर्चेत आली, जेव्हा दोघांच्या वयातील अंतर समोर आलं. दोघांच्या वयामध्ये मोठं अंतर पाहायला मिळालं होतं.

सोनम कपूर

सोनम आणि रणबीर यांनी सावरिया चित्रपटात एकत्र काम केलं होतं. शूटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते.

दीपिका पादुकोण

रिलेशनशीपची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे रणबीर आणि दीपिका पादुकोनची. त्यांचा वाईट पध्दतीने ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते.

नरगीस फाक्री

अभिनेत्री नरगीस फाक्री आणि रणबीरने रॉकस्टार या चित्रपटात एकत्र काम केले आहे. पण, त्यांनी आपले रिलेशनशीप कन्फर्म केले नव्हते.

अँजेला जॉन्सन

रणबीर आणि आणि अँजेला दोघे २०११ मध्ये एकत्र स्पॉट झाले होते. दोघांचे अपेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

कॅटरीना कैफ

कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर दोघे सीरीयस रिलशनशीपमध्ये होते. दोघांचा शेवटचा चित्रपट जग्गा जासूस नंतर वेगळे झाले.

माहिरा खान

न्यूयॉर्क शहरात रणबीर आणि माहिरा खानने आपल्या तथाकथित संबंधांविषयी मौन सोडल होते. या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT