अलाना पांडेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे Alanna Panday Instagram
मनोरंजन

अनन्या पांडेची चुलत बहिण अलानाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे हिने सुंदर बाळाला जन्म दिलाय. मागील वर्षी मार्च महिन्यात आयवर मॅक्रेशी ती विवाहबंधनात अडकली. अलाना आणि आयवरने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून घोषणा केली होती की, ते आपल्या पहिल्या बाळाची प्रतीक्षा करत आहेत. आता या कपलने एक सुंदर बाळाचे स्वागत केलं आहे. त्यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली होती की, त्यांना एक मुलगा झाला आहे. अलाना, आयवर आणि बाळ व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करताना अलानाने लिहिलं, 'आमचा तान्हुला एंजल येथे आहे.' अनन्याने हा व्हिडिओ शेअर करून कॉमेंट दिली आहे. ती म्हणाली, 'माझं सुंदर बाळ इथे आहे.'

अलाना पांडेची अशी होती बेबी शॉवर पार्टी थीम

अलानाने बेबी शॉवर पार्टी थीम निळ्या रंगाची ठेवली होती. बेबी शॉवरमध्ये अनन्याचा तथाकथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.

लग्नात आला होता शाहरुख खान

बेबी शॉवरमध्ये गौरी खान, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, शनाया कपूर, महीप कपूर सारखे अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती. अलाना एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि मागील वर्षी तिच्या लग्नात शाहरुख खानसह अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली. मुलाच्या जन्मानंतर फॅन्स अलाना-आयवरचे अभिनंदन करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT