Ananya Panday leaves big film  instagram
मनोरंजन

Ananya Panday | अनन्या पांडेने सोडला मोठा चित्रपट! OTT शेड्युलमुळे ‘या’ चित्रपटातून बाहेर

Ananya Panday - ओटीटी प्रोजेक्टच्या नादात अनन्या पांडेने सोडला मोठा चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूड अभिनेत्रीनं अनन्या पांडेने OTT सिरीज साठी मोठ्या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाची मुख्य अभिनेत्री बदलणार असल्याचे म्हटले जात आहे.

अनन्या पांडे चित्रपट तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीमुळे सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली आहेत शिवाय ती आता आणखी नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे तिने एक मोठी चित्रपट सोडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ती तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, तिने आगामी चित्रपट छुमंतरमधील (Choomantar) मधील मुख्य भूमिका सोडल्याची माहिती मिळतेय. यामागील कारणही समोर आलं आहे. OTT सिरीज Call Me Bae 2 च्या शूटिंग शेड्युलमुळे तिला छूमंतर मधून बाहेर पडावे लागले आहे. दोन्ही प्रोजेक्टच्या शूटिंग वेळेत घोळ झाल्याने तिला हा चित्रपट सोडावा लागल्याचे म्हटले आहे.

अनन्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध

तू मेरी मैं तेरा मैं तेरी तू मेरा नंतर, अनन्या पांडे छुमंतर चित्रपटात दिसणार होती. या चित्रपटात मुंज्या स्टार अभय वर्मासोबत तिची भूमिका होती. पण अनन्याने हा चित्रपट नाकारल्यामुळे कास्ट टीमकडून मुख्य अभिनेत्रीचा शोध घेतला जात असल्याच म्हटले जात आहे.

असे म्हटले जात आहे की, निर्माते सान्या कपूरचा विचार करू शकतात. शिवाय अनन्याच्या जागी साऊथ सुंदरी श्रीलीला आणि जानकी बोदीवाला यांचा विचार केला जातोय. अनन्या पांडे Call Me Bae ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तिने Call Me Bae Season 2 निवडल्याचं म्हटलं जातंय.

'छूमंतर'चे शूटिंग जानेवारी २०२६ पासून सुरू होणार होते. पण मुख्य अभिनेत्री फायनल होत नाही, तोपर्यंत शेड्यूल जैसे थे असेल. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मागील ३ आठवड्यांपूर्वी तीन कलाकारांसोबत एक मॉक शूट झाला होता. ज्यामध्ये अभिनेत्यासोबत कोणत्या अभिनेत्रीची केमिस्ट्री सूट होईल, याचा विचार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT