मनोरंजन

Anant Ambani Radhika Wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. एएनआयने अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची लग्नपत्रिका शेअर करत या संबंधित वृत्त दिले आहे.

अनंत अबानी हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण अखेर ठरले आहे. या दोघांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हा विवाह पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने होणार असल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे.

Anant Ambani Radhika Wedding: 'असा' असेल 'विवाह-सोहळा' कार्यक्रम

शुक्रवार,१२ जुलै- मुख्य विवाह समारंभ (शुभ विवाह)
शनिवार,१३ जुलै- शुभ, दैवी आशीर्वाद कार्यक्रम
रविवार, १४ जुलै- मंगल उत्सव किंवा रिसेप्शन कार्यक्रम

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT