Amruta Subhash-Sonalee Kulkarni will work together  Instagram
मनोरंजन

Amruta Subhash-Sonalee Kulkarni | 'कुठली दुनिया? कोण चार लोक?' बदल स्वतःसाठी घडवायला येताहेत अमृता सुभाष - सोनाली कुलकर्णी

Amruta Subhash-Sonalee Kulkarni Parinati movie | अमृता सुभाष - सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र झळकणार, ‘परिणती- बदल स्वतःसाठी’ यादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत आजवर आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून एक रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावलेली. त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे.

या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ''परिणती या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर विचारही करण्यास भाग पाडेल.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT