Amruta Khanvilkar Instagram
मनोरंजन

Amruta Khanvilkar|'त्या दिग्दर्शकाने मला चक्क सेटवर ढकलून दिलं...' अमृताने शेअर केला धक्कादायक अनुभव

Amruta Khanvilkar|'त्या दिग्दर्शकाने मला चक्क सेटवर ढकलून दिलं...' अमृताने शेअर केला धक्कादायक अनुभव

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शूटिंगदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला. एका दिग्दर्शकाने तिला सेटवर ढकलून दिलं होतं, असं सांगताना अमृता भावूक झाली. त्या घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या हादरली होती, असंही तिने सांगितलं.

'फिल्मफेअर ॲक्टर्स राउंडटेबल' (Filmfare Actors' Roundtable) या कार्यक्रमात जितेश पिल्लाई यांच्याशी संवाद साधताना अमृताने तिच्या आयुष्यातील एका अतिशय वेदनादायी आणि त्रासदायक आठवणीला उजाळा दिला. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका पुरुष दिग्दर्शकाने तिला विनाकारण शारीरिकरित्या धक्का (Physically Pushed) दिला होता, अशी धक्कादायक माहिती तिने दिली आहे.

अमृताने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये एक नवा चेहरा होती. तरीही, कोणत्याही चुकीशिवाय त्या दिग्दर्शकाने तिला सेटवर सर्वांसमोर धक्का दिला. या अनपेक्षित प्रकारामुळे अमृताला इतका मोठा मानसिक आणि शारीरिक धक्का बसला की तिची प्रकृती खालावली. तिने या अनुभवाचे वर्णन करताना म्हटले की, "त्या घटनेनंतर माझे शरीर आणि मन पूर्णपणे सुन्न झाले होते. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते."

अभिनेत्री अमृता खानविलकरने 'फिल्मफेअर ॲक्टर्स राउंडटेबल' (Filmfare Actors' Roundtable) मध्ये बातचीत केली. अमृता सोबत यावेळी प्रिया बापट, सई ताम्हणकर उपस्थित होती. अमृताने तिच्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

अमृता खानविलकरने तिच्यासोबत घडलेली एक वाईट आठवण शेअर केली. या मुलाखतीदरम्यान अमृताने तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले. जेव्हा ती मुंबईत नवीन होती, तेव्हा तिला काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. एका वेळी तिच्याकडे जवळपास २ वर्षे काहीच काम नव्हते. त्या कठीण काळातील आणि इंडस्ट्रीतील काही कटू किंवा त्रासदायक अनुभव तिने या व्हिडिओत शेअर केले आहेत. ज्यानंतर 'राझी' (Raazi) चित्रपटामुळे तिच्या करिअरला एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी मिळाली.

सेटवर नेमकं काय घडलं होतं?

अमृताने सांगितले की, 'मी एका चित्रपटाच्या सेटवर शूटला होते. दिग्दर्शकाने तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तो खूप बोलत होता. तरीही मी ऐकत होते. सहन करत होते. तो सातत्याने मला त्रास देत होता. पण नंतर एक क्षण असा आला की, चक्क त्या माणसाने मला ढकलले. कोणतेही कारण नसताना त्या डायरेक्टर मला सेटवर ढकलून दिले. समोरच अभिनेता सेटवर उभा राहिला होता. बिचारा तो हा सर्व प्रकार पाहत होता. क्षणभरात माझे शरीर आणि मेंदू काम करणे बंद झाले. मी पटकन रुग्णालयात गेले. मला कळलेच नाही की, काय झालं? तो असं का वागला?'

अमृताचा हा खुलासा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ग्लॅमरच्या या जगात महिला कलाकारांना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते, ही गोष्टचं खूप भीतीदायक आहे. 'वाजले की बारा' या गाण्यापासून ते कट्यार काळजात घुसली, 'राझी' आणि 'तस्करी'पर्यंत अमृताने आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला आहे. इथवर पोहोचण्यामागील तिचा हा संघर्ष थक्क करणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT