'बिग बॉस मराठी ४' मध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे तब्बल काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतली आहे. 'वशीकरण' या नवीन गूढ आणि थरारक मालिकेत अमृता मुख्य भूमिकेत दिसतेय. या मालिकेचा लूक आणि अमृताचा त्यातील वावर पाहून ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Amruta Dhongade new tv serial vashikarna
मिसेस मुख्यमंत्री मालिकेत सुमीची भूमिका साकारून अमृता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर आता तिची आणखी एक नवी मालिका येतेय. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला नेहमीच दाद दिलीय. आता अमृताने छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक केलं.
‘वशीकरण’ या आगामी मालिकेतून अमृता एका अत्यंत वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर आलीय. अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी मालिकेचे काही व्हिडिओ शेअऱ केलेत, ज्यामध्ये तिचा गावरान लूक दिसतोय. तिने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे- वशीकरण किसपे रखे विश्वास?
पण ‘वशीकरणं’मध्ये ती पूर्णपणे वेगळ्या शेडमध्ये दिसतेय. त्यामुळे तिचे हे पात्र चाहत्यांना कितपत आवडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘वशीकरणं’ ही कथा थोडी गूढ, थरारक आणि अलौकिक घटकांनी भरलेली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमृताची भूमिका कथानकात महत्त्वाची आणि ट्विस्ट देणारी असू शकते. या नव्या भूमिकेमुळे अमृता धोंगडे तिच्या अभिनयातील वेगळं रूप दाखवणार आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कलाकार कोण?
अमृता धोंगडे सोबत स्नेहलता वसईकर, मनोज कोल्हटकर, मिलिंद दास्ताने, अखिल लाळे या कलाकारांच्या भूमिका असतील. या मालिकेच्या कहाणीत एक नवं भावनिक वळण असणार आहे.