Allu Arjun brother Sirish wedding photo viral  instagram
मनोरंजन

Allu Arjun brother Sirish wedding | अल्लू अर्जुनचा भाऊ, अभिनेता अल्लू शिरीष अखेर लग्नबंधनात; रामचरण सूर्यासह सेलिब्रिटींची मोठी हजेरी

Allu Arjun Sirish wedding | अल्लू अर्जुनचा भाऊ, अभिनेता अल्लू शिरीष अखेर लग्नबंधनात; सूर्यासह सेलिब्रिटींची मोठी हजेरी

स्वालिया न. शिकलगार

साऊथ अभिनेता अल्लू सिरिश अखेर लग्नबंधनात अडकला असून या सोहळ्याला अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अल्लू अर्जुनचा भाऊ असलेल्या सिरिशच्या लग्नात रामचरण आणि सूर्या यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या भव्य लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Allu Arjun brother Sirish wedding photos goes viral

पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा भाऊ, अभिनेता अल्लू शिरीष आणि नयनिका रेड्डी लग्न बंधनात अडकले. नयनिका आणि शिरीषचा लग्नातील पहिला फोटो व्हायरल होत आहेय या लग्नसोहळ्यासाठी खुद्द साऊथ स्टार सूर्या, राम चरण, लोकेश कनागराज, वेंकटेश, चिरंजीवी उपस्थित होते.

अल्लू शिरीष आणि नयनिका रेड्डी यांचे लग्न ६ मार्च रोजी हैदराबादमध्ये पार पडले. यावेळी त्यांच्या लग्नात साऊथ स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळाली.

नयनिका रेड्डीशी विवाहबंधनात

शिरीष आणि नयनिकाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केलं होतं. शुक्रवार, ६ मार्च रोजी आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी पारंपरिक पद्धतीने विवाह केला. शिरीषचा चुलत भाऊ राम चरणने लग्नातील पहिला फोटो एक्स हँडलवर शेअर केला. त्याने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले-“@AlluSirish ला #Nayanika सोबतचा शानदार नव्या प्रवासाची सुरुवात करताना पाहून खूप आनंद झाला. तुम्हा दोघांना नेहमी आनंदित, प्रेम आणि उत्तम वैवाहिक जीवन जगण्यासाठी शुभेच्छा. अभिनंदन.”

शिरीष-नयनिकाच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची गर्दी

शिरीषचा भाऊ अल्लू अर्जुन, वहिनी स्नेहा रेड्डी आणि भाची आणि पुतणे, अरहा आणि अयान हे देखील क्रीम कलर आऊटफिटमध्ये लग्नाला उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोजमध्ये रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी कपलला आशीर्वाद देताना दिसत आहेत. फोटोजमध्ये रामचरण-उपासना फोटो पोज देताना दिसताहेत. तसेच अल्लू अर्जुन- स्नेहा रेड्डी देखील पोझ देताना दिसताहेत.

तीन साऊथ सुपरस्टार्स एकत्र

अल्लू शिरीष आणि नयनिका रेड्डी यांच्या लग्नातील एक कास फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये मेगास्टार चिरंजिवी, अल्लू अर्जुन, सूर्या एकत्र बसलेले दिसत आहेत. ते एकमकांशी बोलताना दिसताहेत.

कोण आहे अल्लू शिरीष?

अल्लू शिरीषचा जन्म ३० मे, १९८७ मध्ये झाला. तेलुगु चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे. अल्लू शिरीष अल्लू अर्जुनचा लहान भाऊ, निर्माते अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे. तर दिग्गज विनोदी कलाकार अल्लू रामलिंगय्या यांचा नातू आहे. त्याने २०१३ मध्ये 'गौरवम' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले होते. त्याने 'कोठा जनता' (२०१४), 'श्रीरस्तु सुभमस्तु' (२०१६), 'ओक्का क्षानम' (२०१७) आणि 'उर्वशिवो राक्षसशिवो' (२०२२) यांसारख्या चित्रपटांत त्याने काम केले आहे. त्याने '१९७१: बियॉन्ड बॉर्डर्स' या मल्याळम चित्रपटातही काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT