दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी हैदराबादमध्ये एका सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असताना अचानक मोठ्या गर्दीने तिला वेढले. सुरक्षेअभावी स्नेहाला गर्दीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या अति उत्साहावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी हिच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान स्नेहाला चाहत्यांच्या प्रचंड गर्दीने वेढल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. या प्रसंगी तिला गर्दीतून बाहेर पडण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा रेड्डी एका कार्यक्रमासाठी हैदराबादमधील एका ठिकाणी पोहोचली होती. तिची चाहत्यांमध्ये मोठी लोकप्रियता असल्याने अनेक जण तिचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पुढे सरसावले. काही क्षणांतच गर्दी इतकी वाढली की तिच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन स्नेहाला सुरक्षितपणे गाडीपर्यंत नेण्यासाठी मेहनत करताना दिसतोय. त्याला गर्दीतून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय.
रिपोर्टनुसार, पुष्पा २ स्टार पत्नी स्नेहा रेड्डी सोबत हैदराबादमध्ये एका उद्घाटन समारंभात सहभागी झाला होता. त्यानंतर दोघे एका कॅफेसाठी गेले तेव्हा फॅन्सनी त्यांना पाहून गर्दी केली. गर्दी इतकी वाढली की, अल्लू अर्जुन आणि त्याच्या पत्नीला तारेवरची कसरत करावी लागली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अल्लू आपल्या पत्नीला गाडीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतान दिसतोय. त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी इतकी वाढते की, सुरक्षारक्षकांनाही आवर गालता येत नव्हते. दरम्यान, अल्लू सुरक्षितरित्या आपल्या पत्नीला गाडीपर्यंत पोहोचवतो. ती गाडीमध्ये बसल्यानंतर देखील तो काही वेळ गाडी बाहेर उभारून फॅन्सना नमस्कार करत अभिवादन करतो. आणि माहे गटण्यासाठी विनंती करतो.
काही दिवसांपूर्वी, अभिनेत्री निधि अग्रवालला देखील या घटनेला सामोरे जावे लागले होते. ती हैदराबादच्या एका मॉलमध्ये 'द राजा साहब'च्या सॉन्ग लॉन्च इव्हेंटमध्ये गेली होती. तिथून बाहेर पडताना फॅन्सची गर्दी प्रचंड वाढते. खूप कठीण स्थितीतून आपल्या गाडीपर्यंत पोहोचली होती. व्हिडिओमध्ये दिसत होतं की, ती त्यावेळी खूप घाबरली होती.