Allu Arjun announcement Raka  pudhari photo
मनोरंजन

Allu Arjun Raka | अल्लू अर्जुनचा वाढदिवशी मोठा धमाका! 'राका' चित्रपटाचा अतरंगी लूक व्हायरल; ॲटली आणि दीपिकाची मिळणार साथ

Allu Arjun Raka | वाढदिवशी 'खिलाडी' अल्लू अर्जुनचा धमाका! 'राका'चा फर्स्ट लूक व्हायरल; ॲटली-दीपिकासोबत नवा इतिहास घडवणार?

स्वालिया न. शिकलगार

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. त्याने दिग्दर्शक ॲटली यांच्यासोबतच्या आगामी मेगा-प्रोजेक्टचे टायटल 'राका' (Raka) असल्याचे जाहीर केले असून, चित्रपटाचा पहिला लूकही शेअर केला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील बदललेला आणि अत्यंत रांगडा लूक पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली असून, हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

allu arju atlee announced raka movie title

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राईज'च्या यशानंतर आता सर्वांचे लक्ष त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सकडे लागले आहे. आज आपल्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत, त्याच्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'राका' (Raka) असून याचा पहिला लूक पाहून सिनेप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

या चित्रपटात तो दिग्दर्शक ॲटली सोबत काम करत असून त्याच्यासोबत दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे. हा चित्रपट तयार होत असून, अल्लू अर्जुनच्या मुख्य भूमिकेतील हा मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने ॲटली सोबतच्या पुढील चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत त्याचे टायटल ‘राका’ असे जाहीर केले. पोस्टर आणि टायटल शेअर करताना मेकर्सनी लिहिले, “#AA22xA6 आता #राका आहे. एका नवीन आणि अनोख्या जगासाठी तयार व्हा. @alluarjunonline @atlee47 @deepikapadukone.”

पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा पूर्णपणे बदललेला आणि आश्चर्यचकित करणारा लूक पाहायला मिळतो. त्याचा हा अवतार याआधी कधीच पाहिला गेला नव्हता. मोठ्या टोकदार नखांसह त्याच्या चेहऱ्याचा एक भाग झाकताना दिसतो. तर त्याच्या काजळ लावलेल्या तीक्ष्ण डोळ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्धवट टक्कल आणि रफ हेअरस्टाईलसह ‘राका’ टायटल सध्या ट्रेंडींग वर आहे. त्याचा हा रहस्यमयी चेहऱ्यामागे काय कहाणी असेल, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळू शकेल.

ॲटली आणि अल्लू अर्जुनची जोडी

'जवान' फेम ब्लॉकबस्टर दिग्दर्शक ॲटली (Atlee) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. ॲटली आणि अल्लू अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्याने, हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ॲक्शन ड्रामा मानला जात आहे. अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या टायटल पोस्टरमध्ये त्याचा लूक अतिशय वेगळा, अंगावर काटा आणणारा आहे.

एक मोठा बदल म्हणजे अल्लू अर्जुनचा असा लूक भारतात पाहायला मिळालेला नाही. पोस्टरमधील डार्क बॅकग्राउंडमधून बाहेर येणारा लांडग्यासारखा हात आणि त्याचे टोकदार पंजे चित्रपटाची गूढ कथा अधिक थरारक पाहायला मिळणार आहे.

दीपिका पदुकोणची महत्त्वाची भूमिका

दुसरीकडे, या चित्रपटात बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. दीपिका आणि अल्लू अर्जुन ही जोडी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT