नेटफ्लिक्सचा बहुचर्चित आणि स्पेशल शो 'डायनिंग विथ कपूर्स' (‘Dining With The Kapoors) रिलीज होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे. ट्रेलर आल्यापासूनच या शोसाठी उत्सुकता वाढली आहे. पहिल्यांदाच एखाद्या स्क्रीनवर कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये रणबीर कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, नीतू कपूर, रणधीर कपूर, रीमा जैन, रिद्धिमा कपूर साहनी, आदार जैन आणि नव्या नवेली नंदा हे एकत्र लंच करताना दिसणार आहेत. (Latest Entertainment News)
हा शो कपूर कुटुंबाची परंपरा, नाती आणि राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीला समर्पित आहे. या शोच्या ट्रेलरमध्ये एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या शो मध्ये चाहत्यांचे एका गोष्टीने लक्ष वेधले ती म्हणजे आलियाची अनुपस्थिती. खरे तर सगळे कपूर एका छताखाली असताना कुटुंबाची ग्लॅमरस सून तिथे नसणे हे सगळ्यांनाचा खटकत होते.
आलिया कुटुंबासोबत का नाही याचा खुलासा अरमान जैनने नुकताच केला आहे. अरमान म्हणतो, ‘ आलिया तिच्या आधीच्या वर्क कमिटमेंटमध्येच व्यस्त आहे. तिने या शोसाठी वेळ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तिला ते शक्य झाले नाही. तिच्या डेट्स या शो सोबत क्लॅश होत असल्याने तिला हे शक्य झाले नाही. आमच्या कुटुंबात ही काही विशेष बाब मानली जात नाही.
या शोचे दिग्दर्शक स्मृति मुंदरानेही सांगितले की 'हे कुटुंब खरेच वर्कोहोलिक आहे. अनेकदा कामामुळे फॅमिली गेट टुगेदरला एखादा सदस्य येऊ शकत नाही. आलियाने तिच्या इंस्टा स्टोरीवर देखील या शोचा ट्रेलर शेयर करत घरच्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.