स्टारकिड असूनही वेगळा होता अक्षय खन्ना! विनोद खन्ना, सावत्र आई.. शाळेतील ज्युनियरने उलगडले गुपित! File Photo
मनोरंजन

स्टारकिड असूनही वेगळा होता अक्षय खन्ना! विनोद खन्ना, सावत्र आई.. शाळेतील ज्युनियरने उलगडले गुपित!

अक्षय खन्नाचे बालपण कसे गेले? शाळेतील आठवणींवरून उलगडले सत्य

पुढारी वृत्तसेवा

akshaye khanna heartbreak kid school crush junior recalls

पुढारी ऑनलाईन :

अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमाच्या यशानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. सिनेमाच्या बॉक्स आफिसवरच्या घोडदौडीनंतर अक्षय खन्नाच्या शाळेतील एका ज्युनियरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

सिनेमाचा मोठा पडदा असो किंवा सोशल मीडिया सगळीकडे सध्या अक्षय खन्नाचीच चर्चा सुरू आहे. कारण आहे धुरंधर सिनेमातील त्‍याची दमदार भूमिका. रणवीर सिंह मुख्य अभिनेता असलेल्या या सिनेमात अक्षय खन्नाचेच अधिक कौतूक होत आहे. या दरम्यान त्‍याच्या शाळेतील एका ज्युनियरने त्‍याच्या लहानपणीच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

राजकारणी आणि शाळेतील अक्षय खन्ना यांची ज्युनियर असलेली सायरा शाह हलीम यांनी नुकतेच सांगितले की, शालेय जीवनात अक्षय खन्ना खूप लाजऱ्या बुजऱ्या स्वभावाचा होता. यावेळी संपूर्ण शाळेचा त्‍यांच्यावर क्रश होता.

लॉरेन्स स्कूल लवडेल चा 'ओरिजिनल हार्टब्रेक किड'

सायरा शाह हलीम यांनी आपल्या इंस्टाग्रामवर अक्षय खन्नाचा एक फोटो शेअर केला आहे. त्‍यांनी लिहिलंय की, लॉरेन्स स्कूल लवडेल चा 'ओरिजिनल हार्टब्रेक किड' मला वाटते यापूर्वी मी असे शेअर केले नव्हते. मात अक्षय खन्ना लॉरेंस स्कूलमध्ये आमच्यापेक्षा काही वर्षांनी सिनिअर होते. जिथे मी माझा भाउ मेजर मोहम्मद अली शाह यांच्यासोबत बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत होते. लॉरेंस स्कूल लवडेलच्या हॉलमध्ये सर्वांना उत्‍सुकता लागून राहिली होती. चर्चा होती की, विनोद खन्ना यांचा मुलगा क्लास 11th मध्ये प्रवेश घेणार आहे. यावेळी आम्हाला उत्‍सुकता होती की तो कसा दिसतो.

शाळेत अक्षय खन्ना सर्वांचे क्रश होते

पुढच्या दोन वर्षात आम्ही त्‍यांना रोज पाहिले. आमच्या जवळून जाताना. कँपसमध्ये वरून खाली फिरताना ते त्‍यावेळी सर्व शाळेचे क्रश होते.

तो शांत वादळ होता....

अक्षय फुटबॉल टीमचा आरडाओरड करणारा कॅप्टन नव्हता. तो शांत वादळ होता. तो कमी बोलणारा होता. त्‍याने शाळेत असताना आपल्या मितरांसाठी एक नाटकात काम केले. अक्षय खन्ना एक हरस्यमयी व्यक्ती होता. तो कोणत्‍याही मोठ्या ग्रुपमध्ये सहभाग घेत नव्हता. लॉनमध्ये चहा पिताना, एकटाच फेरफटका मारताना दिसायचा. त्‍याला शांत राहणे पसंत होते. ते जास्त कोणत्‍याही मुलीशी बोलत नसतानाही ते कँपसमध्ये सर्वात लोकप्रिय सिनियर होता.

सायरा यांनी शेवटी लिहिलंय की, मला आठवते की, त्‍याचे वडील विनोद खन्ना आणि त्‍याची सावत्र आई त्‍यांना नेहमी भेटायला यायचे. काही काळानंतर जेंव्हा ते चितरपट सृष्टीत गेले तेंव्हा मला त्‍याचे काही आश्चर्य वाटले नाही. सुरूवातीला काही सिनेमे चालले काही नाही चालले. यामध्ये सर्वात एक गोष्ट तशीच आहे ती म्हणजे तो सुरूवातीपासूनच एक शांत आणि रहस्यमयी राहिला आहे. मला आनंद आहे की, त्‍यांना आता प्रसिद्धी मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT