Drishyam 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर अभिनेता अक्षय खन्नाने आपली फी थेट २१ कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे. Drishyam-3 संदर्भात एका निर्मात्याने केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
Akshaye Khanna drishyam 3 latest news
धुरंधरने बॉक्स ऑफिसवर २२ दिवसात तब्बल ६५० कोटींचे कलेक्शन केले आहे तर वर्ल्डवाईड १००० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. संपूर्ण चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा तर झालीच. पण, खलनायक अक्षय खन्नाच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली. दरम्यान, दृषश्यम ३ बद्दल अपडेट आली. आणि अक्षय खन्ना ने ही ऑफर नाकारली आहे. एकीकडे त्याने आपली फी वाढवल्याने दृश्यमचे निर्माते नाराज आहे तर दुसरीकडे चित्रपटात विग वापरण्यावरून अक्षय खन्नाने दृश्यम ३ सोडल्याचे म्हटले जात आहे.
अक्षय खन्नाने २१ कोटी मागितले
अक्षय खन्नाने दृश्यम ३ साठी निर्मात्यांकडे २१ कोटी मागितल्याचे वृत्त समोर आले. सोशल मीडियावर नेटकरी, या विषयावरून अक्षयचे समर्थन करत आहेत. तो २५ कोटींचा हकदार आहे, असे म्हणत आहेत.
विगच्या मागणीवरून अक्षय दृश्यम ३ मधून बाहेर
रिपोर्टनुसार, निर्माता कुमार मंगत पाठकने अक्षयसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता. त्यासाठी अक्षयने ॲडव्हान्स देखील घेतले होते आणि स्क्रिप्टचे कौचुक देखील केले होते. पण, दृश्यम २ मधील आपल्या भूमिकेसाठी केसांना विग लावण्यावरून चित्रपट सोडला. ज्यामुळे चित्रपटाची कंटिन्यूटी तुटली आहे. कारण , सीक्वल त्याच्यापासूनच सुरु होतो.
पाठक यांनी फी वाढवण्याच्या अफवा नाकारल्या. धुरंधर सारख्या हिट चित्रपटानंतर अक्षयचा अहंकार यामागील कारण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दृश्यमच्या आधी अनेक वर्ष तो बेरोजगार होता. दरम्यान, अक्षय खन्नाची जागा जयदीप अहलावत घेणार असल्याचे कळते. शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये सुरु होणार असून अजय देवगन आणि अन्य कास्ट सोबत शूट होणार आहे. पाठक आता कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार करत आहेत.
अक्षयवर होणार कायदेशीर कारवाई?
अक्षय खन्नाने Drishyam 3 सोडल्यानंतर निर्माता नाराज आहे. कुमार मंगत पाठक यांनी एका वेबसाईटशी बातचीतमध्ये खुलासा केला की, निर्मात्यांनी अक्षय खन्ना सोबत करार केला होता. दोन्ही पक्षांमध्ये बातचीत झाल्यानंतर अक्षयची फी देखील निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर निर्मात्यांसमोर त्याने मागणी ठेवली की, तो विग घालेल. यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी समजावलं.
दृश्यमच्या दुसऱ्या भागात अक्षय खन्ना विगविना दिसला होता. आता तिसऱ्या भागात तो तसाच असला पाहिजे. त्यावेळी अक्षय खन्ना या भूमिकेसाठी तयार झाला. पण, कुमार मंगत यांनी सांगितले की, काहींनी त्याला सांगितलं की, विग घातल्यावर तो चांगला दिसेल. अक्षयने पुन्हा विनंती करत विगची मागणी केली. यावर अभिषेक पाठकने होकार दिला होता. पण, नंतर निर्मात्यांना अक्षय म्हणाला की, तो या चित्रपटासाठी काम करणार नाही.