akshayaa gurav 
मनोरंजन

akshayaa gurav : अक्षया गुरव आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिटरस्वीट' या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिके मिळवलेली अक्षया गुरव आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आलीय. समुद्रात स्टनिंग लूक दाखवत मस्त फोटो पोझ देणारी अक्षयाचे फोटो चर्चेचा विषय बनला आहे. अत्रयाने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. समुद्रात सनकिस्ड घेतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत.

राधा प्रेम रंगी रंगिली या मालिकेत ती झळकली होती. ती रिवणावायली या चित्रपटातही दिसली होती.

तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोला तिने #समुद्र असा हॅशटॅग दिलाय. दुसऱ्या फोटोला तिने I lost my heart to the sea.? अशी कॅप्शन लिहिलीय. आणखी एका फोटोला तिने #cleanwater असं म्हटलंय.

पहिल्याच भेटीत प्रेमात पडली होती अक्षया

अक्षयाने भूषण वाणी यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया आणि भूषणचा विवाहसोहळा पार पडला होता. दोघांनी महाराष्ट्रीय पद्धतीने विवाह केला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशीपनंतर अक्षयाने भूषणसोबत लग्न केले. पहिल्याच भेटीत अक्षया वाणी यांच्या प्रेमात पडली होती.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी

अक्षया आणि भूषण एकमेकांना एका कॉमन फ्रेंडच्या घरी भेटले होते आणि पहिल्याच भेटीमध्ये भूषणचे वागणे-बोलणे पाहून अक्षया त्याच्या प्रेमात पडली होती. काही महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

तिने मेहंदीचे, हळदीचे सोशल मीडियावर अपलोड केले होते. तेव्हा तिच्या फॅन्सना तिच्या लग्नाची बातमी समजली होती. लग्नानंतरही तिने लग्नातील काही खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT