‘सुंदरा’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया नाईक आता एका तस्करीवर आधारित कथेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अमृता खानविलकरनंतर अक्षया दुसरी मराठी अभिनेत्री आहे, जी थेट या प्रोजेक्टमध्ये इम्रान हाश्मीसोबत झळकणार आहे.
Akshaya Naik share screen with emraan hashmi
मराठी टेलिव्हिजन विश्वात ‘सुंदरा’ या लोकप्रिय मालिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री अक्षया नाईक आता तिच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांची मने जिंकणारी अक्षया आता थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून, तिचा आगामी प्रोजेक्ट विशेष चर्चेत आहे.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत सुंदरा ही भूमिका साकारून अभिनेत्री अक्षया नाईकने प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली. आता अक्षया नाईकच्या हाती अक नवा प्रोजेक्ट लागला आहे. ती लवकरच एका मोठ्या बॉलिवूडपटात झळकणार आहे. मावळत्या वर्षात तिने प्रेक्षकांना ही आनंदाची वार्ता दिलीय. काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
तस्करीमधून थेट मोठ्या स्टार्ससोबत झळकणार
नेटफ्लिक्सवरील आगामी वेब सीरिज 'तस्करी'मध्ये अक्षया अनेक बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्ससोबत दिसणार आहे. तस्करी सीरीजचा टिझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये ती एका सीनमध्ये इम्रान हाश्मीसोबत दिसतेय. अक्षयाची ही पहिली वहिली वेब सीरिज आहे. इम्रान सारख्या कलाकारांसोबत ती काम करताना दिसणार आहे. अक्षयासाठी ही खूप मोठी संधी आहे.
इम्रान हाशमी सरांसारख्या बॉलिवूडच्या स्टारसोबत आपण काम करतोय ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे दोन-तीन सीन होते. पण ते करताना देखील थोडं दडपण आलं आणि तेवढं छान सुद्धा वाटलं. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इम्रान हाशमी सरांसोबत काम करायला मिळणं, ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं.- अक्षया नाईक, अभिनेत्री
अमृता खानविलकरची लक्षवेधी भूमिका
अमृताने तिच्या फॅन्सना एक सरप्राईज दिले आहे. ती तस्करी या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. अमृता आणि बॉलिवुड अभिनेता इम्रान हाशमी यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
अमृताने सोशल मीडिया "तस्करी"चा टीझर शेअर केला आहे. तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तिने हा टिझर पोस्ट केला आहे. इम्रान सोबत तिची काय भूमिका साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.