Akshay Kumar song Ram Ji Aake Bhala Karenge out  instagram
मनोरंजन

Akshay Kumar song Ram Ji Aake Bhala Karenge | Volume वाढवा! अक्षय घेऊन आला ‘रामजी आके भला करेंगे’ गाणे, एनर्जेटिक अन्‌ फुल कॉमिक

Akshay Kumar song Ram Ji Aake Bhala Karenge | Volume वाढवा! अक्षय घेऊन आला ‘रामजी आके भला करेंगे’ गाणे, एनर्जेटिक अन्‌ फुल कॉमिक

स्वालिया न. शिकलगार

अक्षय कुमारचं ‘रामजी आके भला करेंगे’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एनर्जेटिक बीट्स, धमाल डान्स स्टेप्स आणि कॉमिक टचमुळे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Akshay Kumar song Ram Ji Aake Bhala Karenge released

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा चाहत्यांसाठी धमाल घेऊन आला आहे. त्याचं नवीन गाणं Ram Ji Aake Bhala Karenge नुकतेच रिलीज झालं असून, ते एनर्जेटिक, कॉमेडी आणि मस्तीने भरपूर आहे.

‘भूत बंगला’ या चित्रपटातील हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगवर आहे. याआधी गाने ‘राम जी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर निर्मात्यांनी रिलीज केला होता. या गाण्यात अक्षय कुमार आपल्या क्लासिक कॉमिक अंदाजात दिसत आहे.

फास्ट बीट्स, भीतीदायक वातावरण आणि हॉरर पण कॉमिक दृश्यांनी भरलेला व्हिडिओ दिसत आहे. सोशल मीडियावर गाणं रिलीज होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Volume वाढवा असे म्हणत अक्षयने इन्स्टाग्रामवर गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय.

‘राम जी आके भला करेंगे’ हे गाणे प्रीतमने कंपोज केलं आहे, बोल राकेश कुमार पाल यांचे आहेत तर अरमान मलिक आणि आरवन (देव अरिजीत) ने आवाज दिला आहे. मेलो डी द्वारा लिखित हे गाणे पाहून नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडिया एका नेटकऱ्याने लिहिले-“OG खिलाडी एनर्जी”. तर आणखी एकाने म्हटले-“चार्टबस्टर”. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळू शकेल की, हा चित्रपट हिट होतो की सुपर डुपर हिट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT