Akshay Kumar Daughter Nitara gets offensive message  Instagram
मनोरंजन

Akshay Kumar Daughter Nitara | 'तुझे न्यूड पिक्चर पाठवशील का?' अक्षय कुमारच्या मुलीसोबत घडला धक्कादायक प्रसंग

Cyber Crime Akshay Kumar Daughter Nitara | सायबर क्राईमचा फटका! अक्षय कुमारच्या मुलीला अश्लिल मेसेज

स्वालिया न. शिकलगार

Cyber Crime Akshay Kumar Daughter Nitara offensive message

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आपल्या खासगी जीवनाबद्दल कधीच सार्वजनिक करत नाही. पण, नुकताच एका सायबर अवेअरनेस कार्यक्रमात अक्षयने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी नितारा ऑनलाईन गेम खेळताना सायबर क्राईमची शिकार होताना वाचली.

अक्षयने सांगितले की, 'माझ्या घरी झालेली घटना मी तुम्हा सर्वांना सांगतो. एका अनोळखी व्यक्तीचा निताराला ऑनलाईन गेम खेळताना मेसेज आला की, तू मेल आहेस की फिमेल? तर तिने फिमेल असे उत्तर दिले. त्याने विचारले की, तुझे न्यूड पिक्चर पाठवशील का? निताराने लगेच गेम बंद केला आणि आई ट्विंकलला ही घटना सांगितली.'

ही माझ्या मुलीसोबत झालं. यासारख्या घटना होतात. हे सर्व सायबर क्राईमचा हिस्सा आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, आमच्या राज्यात सातवी, आठवी, नऊवी आणि दहावी इयत्तेसाठी प्रत्येक सायबर पीरियड नावाने एक सेशन असायला हवे, जिथे मुलांना शिकवले जाईल.' यावेळी अक्षय कुमारने पालकांना सायबर क्राईमबाबत सावध केले.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना मुलगी नितारा १३ वर्षाची आहे. तिने आपला १३ वा वाढदिवस आजी डिंपल कपाडिया आणि मावशी रिंकी खन्नासोबत साजरा केला. ती लाईमलाईटमध्ये कधी राहत नाही. अक्षय आणि ट्विंकल सोशल मीडियावर कधी-कधी तिच्यासोबतचे फोटो शेअर करतात.

या चित्रपटात दिसणार अक्षय

आता अक्षय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो प्रियदर्शनच्या 'हैवान' चित्रपटात दिसेल. त्याच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत असेल. अक्षय कुमार 'हेरा फेरी ३' आणि 'भूत बंगला' सारख्या चित्रपटांत दिसणार आहे. अखेरीस अरशद वारसी सोबत 'जॉली एलएलबी ३' मध्ये दिसला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर अक्षयची पत्नी ट्विंकल चॅट शो 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'मुळे चर्चेत आहे.

video-viralbhayani insta वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT