‘अखंड 2’ चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड झाला. महाकुंभाची भव्यता, बालकृष्णाचा नवा अवतार आणि ‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी हिचा खास सीन ट्रेलरचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
Akhanda 2 Trailer out
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता नंदमुरी बालकृष्णचा यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट 'अखंडा २' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. फॅन्स या चित्रपटाच्या ट्रेलर खूप पसंती देताहेत. ट्रेलरमध्ये सनातन हिंदू धर्मच्या शक्तीवर जोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाकुंभची प्रचंड झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर आलीय.
नंदमुरी बालकृष्ण आणि ब्लॉकबस्टर मेकर बोयापति श्रीनुचा धार्मिक ॲक्शन चित्रपट 'अखंडा २: थांडव' लवकरच जगभरात रिलीज होणार आहे. टीमने चित्रपटाच्या प्रचारासाठी मोठ्या स्तरावर संपूर्ण देशात मोहीम चालवली आहे. १४ रील्स प्लस बॅनर अंतर्गत राम अचंता आणि गोपिचंद अचंता यांनी चित्रपट बनवला आहे तर एम तेजस्विनी नंदमुरी प्रस्तुत करत आहेत.
साऊथचा पॉवरस्टार नंदमुरी बालकृष्ण पुन्हा एकदा एनर्जेटिक अवतारात मोठ्या पडद्यावर अवतरण्याची तयारी करत आहे. ट्रेलरमध्ये त्यांचा नवा अवतार अत्यंत प्रभावी दाखवण्यात आला आहे, कधी रुद्रावतार, तर कधी शांत संतस्वरूप. विशेष म्हणजे, या वेळी कथा महाकुंभातील अंधाऱ्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी सुरू झालेल्या संघर्षाभोवती फिरते असे दिसते.
ट्रेलरमध्ये दाखवलेली गर्दी, नदीकाठचा महाआरती सोहळा, ध्वनी-प्रकाशाची खेळी आणि धार्मिक वातावरण यामुळे चित्रपटाचा स्केल किती प्रचंड आहे हे स्पष्ट होते. दिग्दर्शकांनी एकाच वेळी अध्यात्म, भक्ती, अॅक्शन आणि ड्रामा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.
बेंगलोरमध्ये चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यावेळी कन्नड स्टार शिव राजकुमार उपस्थित होते. ट्रेलरची सुरुवात एका चिथावनीने होते. 'अखंडा २' च्या ट्रेलरमध्ये म्हटलं गेलंय की, 'लेकिन जब श्रद्धा डगमगाने लगती है, तब एक शक्तिशाली ताकत उठती है। वह है अखंडा, जो दिव्य आग की तरह प्रकट होता है और विरोधियों के खिलाफ लड़ने के लिए तैयार होता है।'
बोयापति श्रीनु यावेळी बिग बजट चित्रपट आणत आहेत. 'अखंडा २'ची कहाणी केवळ भारतापर्यंत मर्यादित नाही तर यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि अध्यात्मिक शक्तीचे मिश्रण आहे. कुंभमेळ्याचा सीन ट्रेलरची मोठी खासियत आहे.