Akanksha Puri reveal Mika Singh marriage
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीच्या 'स्वयंवर-मीका दी वोहटी' टीव्ही शोची खूप चर्चा झाली होती. ती मीकाची नवरी होणार होती. पण, शो संपताच दोघे वेगळे झाले होते. आता यावर अभिनेत्री आकांक्षा पुरीने मौन सोडले आहे. तिने सरळ सांगितले आहे की, 'आम्ही दोघे मनी माईंडेड' आहे.
शोमध्ये मीका-आकांक्षा यांची जोडी पसंतीस उतरली होती. त्यांनी शो जिंकला देखील होता. नंतर आकांक्षा ही मीकाची नवरी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. पण शो संपताच ही जोडी तुटली. आता यावर आकांक्षाने मौन सोडले आहे. आकांक्षा पुरीने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळी तिने मीका सोबत स्वयंवर शो जिंकल्याविषयी बातचीत केली आणि सांगितले की, शो संपताच तिला खूप काम आणि पैसे मिळाले होते.
ती म्हणाली, मीका सिंह सोोबत अद्यापही तिची मैत्री आहे. स्वयंवर शो नंतर मीका आणि तिला खूप कॉल्स आले होते. ते आजदेखील शोशी संबंधित बातचीत करून हसतात.
आकांक्षा पुरीने भोजपुरी सिनेमामध्ये काम करण्याविषयी सांगितले की, भोजपुरीवाले तिला अफॉर्ड करू शकणार नाहीत. ती म्हमाली की, जितके पैसे इथे एका दिवसासाठी मिळतात, तितके पैसे तिथे एक म्युझिक व्हिडिओ बनवण्यासाठी लागतात. तिचं म्हणणे आहे की, हा तोटा होईल. त्यामुळे भोजपुरीमध्ये अधिक वेळ घालवण्याची तिला इच्छा नाही.
इतकचं नाही तर आकांक्षा पुरीने हा देखील दावा केला की, भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेत्री तिच्यावर जळतात. कारण, जेवढे व्ह्युज बीटीएसवर येतात, तेवढे क्वचितच एखाद्या अभिनेत्रीला येत असतील. खेसारी लाल आणि पवन सिंह विषयी आकांक्षा म्हमाली की, दोघांसोबतही तिचे चांगले बॉन्डिंग आहे. खेसारी चांगला मित्र आहे तर पवन सिंहला तिने हॉट म्हटले.