घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याने नावातून हटवलं 'बच्चन'; नेमकं काय घडलंय? Aishwarya Rai
मनोरंजन

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याने नावातून हटवलं 'बच्चन'; नेमकं काय घडलंय?

Aishwarya Rai : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याने नावातून हटवलं 'बच्चन'; नेमकं काय घडलंय?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधान आलं होतं. या कपलच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टी जाणून घेण्यास चाहते नेहमीच आतुर असतात. दरम्यान, नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात असे काही घडले की, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उत आला आहे. यात खास करून ऐश्वर्या रायच्या नावामधील आडनावच हटवल्याचे निदर्शनास आलं आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक तर्क- वितर्क लढविले जात आहेत.

वास्तविक, ऐश्वर्या राय बच्चन ग्लोबल व्ह्युमन फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचली होती. येथे ती महिलांच्या हक्कांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली, महिलांना त्यांच्या मूल्यांशी तडजोड न करण्याची शिकवण देतानाही दिसली. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

याच दरम्यान व्हिडिओच्या सुरूवातीलाच ऐश्वर्याच्या आडनाव काढून टाकण्यात आल्याने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष केंद्रित केलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे नाव 'ऐश्वर्या राय - इंटरनॅशनल स्टार' असे दाखविण्यात आलं आहे. यामुळे खरोखरंच ऐश्वर्या रॉयने अभिषेकसोबत घटस्फोट घेतला आहे की काय? याबाबत चर्चांना उधान आलं आहे. याच दरम्यान काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्या रॉयने बच्चन आडनाव हटवल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत्त माहिती मिळालेली नाही.

अनंत अंबानींच्या लग्न समारंभात अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन एकटी दिसल्याने घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या होत्या. तिच्यासोबत फक्त त्यांची मुलगी आराध्या दिसली होती, मात्र, बच्चन कुटुंबातील एकही सदस्य तिच्यासोबत दिसला नाही. यानंतर ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबासोबत पटत नसल्याचेही बोलले जात होते.

तर दुसरीकडे घटस्फोटाच्या वृत्तानंतर अभिषेकचे नाव अभिनेत्री निम्रत कौरशीही जोडले गेले, जिच्यासोबत त्याने 'दासवी' चित्रपटात काम केले होते. या सर्वामुळे दोघेजण घटस्फोट घेतील असे चित्र दिसत होते. याशिवाय मध्यतंरी ऐश्वर्याला विमानतळावर सोडण्यासाठी अभिषेक बच्चन आल्याचे कॅमेऱ्यात कैद जाले होते. या सर्व बाबीवरून घटस्फोट झाला आहे की नाही? याबाबत अद्याप तर्क-वितर्क लढविले जात आहे.

( dubaiwomenestablishment instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT