All India Cine Workers Association Complete Ban on Pakistani Artists  file photo
मनोरंजन

Operation Sindoor Complete Ban Pakistani Artists | भारतीय चित्रपट उद्योगातील पाकिस्तानी कलाकार, निर्मात्यांवर आता संपूर्ण बंदी

AICWA Ban Pakistani Artists | पाकिस्तानी कलाकार, निर्मात्यांवर भारतीय चित्रपट उद्योगात काम करण्यावर पूर्ण बंदी घातली आहे.

स्वालिया न. शिकलगार

AICWA complete ban on Pakistani artists, filmmakers and financiers

नवी दिल्ली : ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने एक निवेदन जारी करून पाकिस्तानी कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना भारतीय चित्रपट उद्योगात बंदी घातली आहे. भारतीय चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार, चित्रपट निर्माते आणि वित्त पुरवठादारांवर पूर्ण बंदी घातली आहे. बॉलिवूडमध्ये काम केलेले पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान आणि मावरा होकेन यांनी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानी मनोरंजन उद्योगावर तीव्र प्रहार

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनन पाकिस्तान मनोरंजन उद्योगाविषयी ट्विट केलं आहे. ‘भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार, चित्रपट निर्माते आणि फायनान्सरवर असोसिएशन कडक आणि संपूर्ण बंदीची पुष्टी केलीय. भारतीय कलाकार कोणत्याही पाकिस्तानी प्रतिभेसोबत सहकार्य करणार नाही. आणि कोणतेही वैश्विक व्यासपीठ शेअर करणार नाही. त्याशिवाय सिने असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देणं बंद करण्याची विनंती केलीय.'

संगीत कंपन्यांना खास निर्देश

सिने असोसिएशनने एक्स अकाऊंटवर ट्विट केलं आहे की, भारतीय चित्रपट उद्योगाने पाक कलाकारांवर डोळे झाकून विश्वास करू नये. कारण, ते देशासोबत विश्वासघात करत आहेत. सर्वात आधी आमचा देश आहे. शिवाय सिने असोसिएशनने महटलंय की, भारतीय संगीत कंपन्या या कलाकारांना काम देतात, जे भारतासाठी धोकादायक आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घालण्याची विनंती केलीय.

पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आठ पाकिस्तानी कलाकारांचे आधीच इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. अभिनेता फवाद खान आणि गायक आतिफ अस्लमस, माहिरा खान, हानिया आमिर सहित अन्य कलाकारांचे अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. आता पाकिस्तान चित्रपट उद्योगातील कलाकारांसह निर्माते, फायनान्सरना देखील भारतीय चित्रपटसृष्टीचा दरवाजा संपूर्णपणे बंद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT