Ahmedabad to London flight crash celebrities' comments
अहमदाबाद - येथील विमान अपघाताच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरुन लंडनला हे विमान निघाले होते. ही घटना गुरुवारी १२ रोजी दुपारी घडली. टेक ऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. पण, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून आपल्या संवेदना व्यक्त करत दु:ख व्यक्त केले आहे. सोनू सूद, सनी देओल, रितेश देशमुख, रणदीप हुड्डा यांनी एक्स अकाऊंटवरून काय म्हटलंय पाहुया.
अहमदाबादमधील विमान अपघाताच्या बातमीने मी खूप दुःखी आहे. वाचलेल्यांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो - त्यांना सापडावे आणि त्यांना आवश्यक असलेली काळजी मिळावी. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या अकल्पनीय काळात शक्ती मिळो.
अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून मी पूर्णपणे दु:खी आणि धक्कादायक आहे. सर्व प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि जमिनीवर असलेल्या प्रत्येकाला ... या अविश्वसनीय कठीण काळात मी त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो.
अभिनेत्री जान्हवी कपूरनेही दुःख व्यक्त केले आहे. तिने लिहिले आहे की, 'अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा दुर्घटनांचे दुःख शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. मी प्रवासी, कर्मचारी आणि प्रत्येक प्रभावित कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करत आहे'.
अभिनेत्री परिणीती चोप्राने विमान अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, 'एअर इंडिया विमान अपघातानंतर कुटुंबियांच्या दुःखाची कल्पना करणे देखील खूप कठीण आहे. मी देवाला सर्वांना शक्ती आणि धैर्य देण्याची प्रार्थना करते'.
अभिनेता अक्षय कुमारने लिहिले आहे की, 'एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातमीने मला धक्का बसला आहे आणि आश्चर्य वाटले आहे. यावेळी फक्त प्रार्थना आहेत'.