Ikkis Release Date announced
मुंबई : अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट 'इक्कीस'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता निर्मात्यांनी अखेर खुलासा केला आहे की, इक्कीस चित्रपट कधी येणार. अमिताभ यांचा नातू आणि श्वेता बच्चन नंदा- निखिल नंदा यांचा पुत्र अगस्त्य चित्रपट विश्वात आपले नशीब आजमावत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘इक्कीस’ची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या रिलीज डेटच्या घोषणेनंतर चाहत्यांकडून मोठी प्रतिक्रिया येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या घराण्यातील तिसरी पिढी अभिनयात उतरली असून, प्रेक्षकांना अगस्त्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (latest Bollywood news)
अगस्त्य नंदाचा हा पहिला चित्रपट 'इक्कीस' आहे. हा चित्रपट सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांची कहाणी आहे. आधी रिलीज डेट सीक्रेट ठेवण्यात आलं होतं. पण निर्मात्यांनी रिलीज डेटचा खुलासा केला आहे. वयाच्या फक्त २१ व्या वर्षी अरुण खेतरपाल यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या शौर्यकथेची कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळेल.
या चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहे. प्रोडक्शन बॅनर मॅडॉक फिल्म्सने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर करत लिहिलं, "२५ डिसेंबर, बहादुरी चित्रपटगृहात येत आहे. सेकेंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, भारताच्या सर्वात कमी वयाच्या परमवीर चक्र हिरोची सांगितली न गेलेली सत्य कहाणी". खास बाब ही की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आलिया भट्ट-शर्वरीच्या अल्फा चित्रपटाशी टक्कर देईल.
'इक्कीस' ट्रेलरमध्ये सैनिकांच्या आयुष्याची झलक दाखवण्यात आलीय. ज्यामध्ये नॅशनल डिफेन्स ॲकेडमीमध्य ते देशाचे नाव उज्ज्वल करण्यापर्यंतचा प्रयत्न समाविष्ट आहे. ट्रेलरमध्ये युद्धाच्या बॅकग्राऊंडमध्ये एक प्रेमळ लव्ह स्टोरी देखील पाहायला मिळेल.
श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स अंतर्गत दिनेश विजानद्वारा निर्मित आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या दरम्यान धाडसी ओळख करून दिली होती. इक्कीसमध्ये धर्मेंद्र अरुण खेत्रपालचे वडीलांच्या भूमिकेत आणि जयदीप अहलावत एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असतील. सिमर भाटिया चित्रपटामध्ये त्यांच्या प्रेयसीची भूमिका दिसेल.